जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 19 वर्ष लेकीला सांभाळलं अन् आईने गळा दाबून संपवलं, आत्महत्येचा बनाव केला पण...

19 वर्ष लेकीला सांभाळलं अन् आईने गळा दाबून संपवलं, आत्महत्येचा बनाव केला पण...


मयत मुलगी ही 8 महिन्याची असताना खाली पडली होती. त्यावेळी तिच्या डोक्याला इजा झाली होती.

मयत मुलगी ही 8 महिन्याची असताना खाली पडली होती. त्यावेळी तिच्या डोक्याला इजा झाली होती.

मयत मुलगी ही 8 महिन्याची असताना खाली पडली होती. त्यावेळी तिच्या डोक्याला इजा झाली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जून : आई आणि मुलीच्या (daughter) नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली आहे. एका आईने  (mother) आपल्या 19 वर्षांच्या मुलीची  हत्या (daughter murder) केल्याची घटना समोर आली आहे. मुलगी मानसिक आजाराने त्रस्त होती, त्यामुळे आईने गळा दाबून खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील परशीवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मुलगी मानसिक आजाराने त्रस्त होती. त्यामुळे तिची देखभाल करणे आणि तिचा सांभाळ करणे हे तिच्या आईला परवडत नव्हते. त्यामुळे आईने हे धक्कादायक पाऊल उचलले. बुधवारी रात्री आरोपीने आपल्या राहत्या घरात आईने 19 वर्षीय मानसिक आजारी असलेल्या मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पोलीस कंट्रोल रुमला फोन केला आणि मुलीने आत्महत्या केली असल्याचं सांगितलं. ( नुपूर शर्मांना समन्स, रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस पोहोचले दिल्लीत! ) पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा पोलिसांना वेगळाच संशय बळावला. पोलिसांनी मुलीच्या आईला चौकशीसाठी बोलावले आणि उलट तपासणी केली. त्यावेळी आईने मुलीची हत्या केल्याचं कबुल केलं. ( 63 वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती, 1959 नंतर पहिल्यांदाच… ) मयत मुलगी ही 8 महिन्याची असताना खाली पडली होती. त्यावेळी तिच्या डोक्याला इजा झाली होती. त्यानंतर ब्रेन हॅमरेज झाल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हा पासून ती मानसिक आजाराने त्रस्त होती.  मुलीची देखभाल करता येत नसल्यामुळे आईने हे पाऊल उचलल्याचे साांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आईला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात