मुंबई, 16 जून : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Team India) 5 टी-20 मॅचची सीरिज खेळत आहे. या सीरिजच्या 3 मॅच झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या दोन्ही दौऱ्यांसाठी वेगवेगळ्या टीमची निवड करण्यात आली आहे. आयर्लंडमध्ये टीम इंडिया 2 टी-20 मॅच खेळणार आहे. या टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) करण्यात आलं आहे. आयपीएल 2022 मध्ये हार्दिकच्या कॅप्टन्सीमध्ये गुजरात टायटन्सचा विजय झाला, याचं बक्षीस त्याला मिळालं आहे. आयर्लंड सीरिजमध्ये हार्दिकची कॅप्टन म्हणून निवड होताच 63 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. 1959 साली 5 खेळाडू कर्णधार यावर्षी जानेवारी 2022 पासून आतापर्यंत 4 खेळाडूंनी टीम इंडियाची कॅप्टन्सी केली आहे. आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पांड्या टीमचा पाचवा कर्णधार असेल. याआधी 63 वर्षांपूर्वी 1959 साली पाच खेळाडूंनी टीम इंडियाची कॅप्टन्सी केली होती. तेव्हा हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, वीनू मंकड, गुलाबराय रामचंद आणि पंकज रॉय हे टीमचे कर्णधार होते. त्यावेळी फक्त टेस्ट हा क्रिकेटचा एकमेव फॉरमॅट होता. पुढची सीरिज खेळणार नाही 4 कर्णधार यावर्षी म्हणजेच जानेवारी 2022 पासून आतापर्यंत विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी टीम इंडियाची कॅप्टन्सी केली आहे. वर्षाच्या सुरूवातीला दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांच्याच घरी विराट कोहलीने (Virat Kohli) टेस्ट सीरिजमध्ये कॅप्टन्सी केली होती, पण पराभवानंतर कोहलीने कॅप्टन्सी सोडली. यानंतर दोन टेस्ट आणि 3 वनडे मॅचच्या सीरिजसाठी केएल राहुल (KL Rahul) टीमचा कर्णधार होता. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजसाठी रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) टीम इंडियाचा कर्णधार आहे. भारताची पुढची सीरिज आयर्लंडमध्ये आहे तेव्हा विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ इंग्लंड दौऱ्यावर आहेत, तर केएल राहुलला दुखापत झाली आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.