मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सिग्नल लागताच रस्त्यावर का नाचतो 'हेल्मेट बॉय'? कारण वाचून वाटेल अभिमान, Video

सिग्नल लागताच रस्त्यावर का नाचतो 'हेल्मेट बॉय'? कारण वाचून वाटेल अभिमान, Video

X
मुंबईकरांना

मुंबईकरांना अनेकदा रस्त्यावर सिग्नल लागताच हेल्मेट घातलेला तरुण नाचताना दिसतो. हा हेल्मेट बॉय कोण आहे आणि तो असं का करतो? हे माहिती आहे का?

मुंबईकरांना अनेकदा रस्त्यावर सिग्नल लागताच हेल्मेट घातलेला तरुण नाचताना दिसतो. हा हेल्मेट बॉय कोण आहे आणि तो असं का करतो? हे माहिती आहे का?

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 3 डिसेंबर : मुंबईत दुचाकी वाहनांच्या अपघातांची संख्या मोठी आहे. अनेकांना हेल्मेट न घातल्यानंही मार बसला आहे. त्यामध्ये काही जणांनी जीवही गमावलाय. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दुचाकीवर बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानंतरही अनेकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत नाही. वाहतूकीचे नियम सर्वांनी पाळावेत. हे नियम पाळले तरच अपघातांची संख्या कमी होऊन लोकांचा जीव वाचावा यासाठी एक तरुण समाजप्रबोधनाचं काम हटके पद्धतीनं करत आहे.

  कशी झाली सुरूवात?

  कल्याणमध्ये खडकपाड्याला राहणाऱ्या सुबोध लोंढे या तरुणांना जनजागृतीसाठी हा हटके प्रयोग केला आहे. त्यानं केलेल्या  प्रयोगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये तो रस्त्यावर हेल्मेट घालून सिग्नलसमोर डान्स करतो. त्याला ही कल्पना सुचण्याचं कारणंही खास आहे.

  मुंबईकरांचा बस प्रवास आणखी होणार 'बेस्ट' वाचा काय आहे नवा प्लॅन

  सुबोध कल्याण पश्चिमेच्या भागातील ट्रॅफिक सिग्नल सुटायची वाट पाहात एकदा थांबला होता. पण, त्यावेळी रस्त्यावरील अन्य वाहनं सिग्नलकडं दुर्लक्ष करत निघून जात असल्याचं त्याला दिसलं. रस्त्यावरचे अपघात रोखण्यासाठी हे थांबलं पाहिजे. वाहनचालकांना शिस्त लागणं आवश्यक आहे, हे त्याला जाणवलं. त्यामधूनच त्यानं हा प्रयोग सुरू केला.

  सुबोध नेमकं काय करतो?

  सुबोधनं मागच्या वर्षी हा प्रयोग सुरू केला. त्यावेळी सोशल मीडियावर  'डोन्ट ट्रस्ट' हे गाणं प्रसिद्ध होतं. या गाण्यावरुन त्यानं डोन्ट ट्रस्ट, रेड सिग्नल इज ऑन' अशी टॅग लाईन बनवली. सुबोध या गाण्यावर रस्त्यावर नाचू लागताच लोकं थांबायला लागली. त्यानंतर त्यानं या पद्धतीचे अनेक व्हिडीओ बनवले.

  मुंबईकर मेधानं बाईकवर केला 25 हजार किलोमीटर प्रवास, पाकिस्तानबद्दल म्हणाली... Video

  रस्त्यावर रेड सिग्नल लागला की सुबोध डान्स करतो. त्याच्या उपक्रमात मित्रांनीही त्याला खंबीर साथ दिली आहे. 'मित्र नसते तर मी धाडस केलंच नसतं. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला 'हेल्मेट बॉय' म्हणून मला आता अनेकजण ओळखतात.' असं सुबोधनं सांगितलं.

  First published:

  Tags: Local18, Mumbai, Traffic, Traffic Rules, Traffic signal