Home /News /mumbai /

महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

दोन दिवसांपूर्वी म्हणजे 18 जुलै रोजी किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले होते. त्यामुळे त्यांना तातडीने...

मुंबई, 20 जुलै: छातीमध्ये दुखू लागल्यामुळे  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्रकृती उत्तम असून त्या परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून (Global Hospital) डिस्चार्ज देण्यात आला असून त्या घरी पोहोचल्या आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे 18 जुलै रोजी किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले होते. त्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखू लागल्यामुळे वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्यात. दोन दिवसांच्या उपचारानंतर किशोर पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बॅनरवर फोटो न लावल्याने शिवसेनेत राडा; आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते भिडले ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, 'ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानत असल्याचे यावेळी महापौर म्हणाल्यात. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा स्थानिक आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू दादा सपकाळ, सुधीर साळवी यांचे विशेष सहकार्य लाभले असून याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच रुग्णालयाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर, वरिष्ठ ह्दयरोग  तज्ञ डॉ.  प्रवीण कुलकर्णी,  अस्थिरोग तज्ञ  डॉ. श्रीधर आर्चिक, पोटविकार तज्ञ डॉ.  अमित मायदेव, यकृत तज्ञ डॉ. आकाश शुक्ला, ग्लोबल रुग्णालयाचे परिचालन प्रमुख अनुप लॉरेंस,  परिचारिका विभागाच्या प्रमुख जेसिका डिसूझा या सर्वांचे सुद्धा महापौरांनी आभार मानले आहेत.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Maharashtra, Mumbai, Mumbai Mayor

पुढील बातम्या