• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • VIDEO: 'साहेब ती मला मारते' लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा

VIDEO: 'साहेब ती मला मारते' लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा

तरुणाच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी ही तरुणी माझ्या मुलाला त्रास देते, मारहाण करते आणि डांबून ठेवते. माझा मुलगा हिच्या वर्तणुकीमुळे त्रस्त झाला आहे, अशा स्वरुपाची लेखी तक्रार दिली होती.

  • Share this:
लखनऊ (उत्तर प्रदेश), 20 जुलै:  प्रेमसंबंध, विवाहबाह्य संबंध, लिव्ह इन रिलेशनशीपवरुन वाद होऊन गुन्हे (Crime) घडल्याचे आपण अनेकदा वाचतो. त्यामुळे हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत (Police Station) पोहोचतात. अनेक गुन्हे किंवा घटना या त्यातील कृत्यामुळे दीर्घकाळ चर्चेत राहतात. लखनऊमध्ये (Lucknow) लिव्ह इन रिलेशनशिपमुळे (Live In Relationship) अशीच एक घटना घडली. यात संबंधित तरुण-तरुणींमधील वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे या घटनेतील तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घालत हाय व्होल्टेज ड्रामा (High Voltage Drama) केला. त्यामुळे पोलीसही त्रस्त झाले. एखाद्या चित्रपटात शोभेल  अशा या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल झाला आणि त्याची जोरदार चर्चा सुरु झाली. पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं, याविषयी सविस्तर माहिती अशी. सआदत गंज पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर ब्रजेश कुमार यादव यांनी याबाबत सांगितले, की गेल्या 5 वर्षांपासून हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. हे दोघे या पूर्वी दिल्लीत राहत होते. मात्र गेल्या 1 वर्षापासून ते काकोरी येथील डुडा कॉलनीत राहतात. हा युवक अंबरगंज रामनगर येथील रहिवासी आहे. या तरुणाच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी ही तरुणी माझ्या मुलाला त्रास देते, मारहाण करते आणि डांबून ठेवते. माझा मुलगा हिच्या वर्तणुकीमुळे त्रस्त झाला आहे, अशा स्वरुपाची लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस या दोघांनाही पोलीस ठाण्यात घेऊन आल्याचे वन इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. (हे वाचा:बसमध्ये सीटवर बसू दिले नाही, मित्रांना बोलावून तरुणाला बेदम मारहाण, VIDEO) 'साहेब, मी हिच्यासोबत घरी जाणार नाही. ही मला खूप मारहाण करते, सतत भांडणं करते, अशी तक्रार एक तरुण रविवारी रात्री लखनऊमधील सआदक गंजमधील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडे करत होता. एकीकडे तो आपलं म्हणणं पोलिसांना सांगत असताना दुसरीकडे त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या तरुणीने पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण बेभान झालेल्या तरुणीने पोलिसांनाच धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. ही तरुणी इथेच थांबली नाही तर तिने इन्स्पेक्टरकडील रिल्व्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या प्रियकराला ती फरफटत घेऊन जाऊ लागली. आरडाओरडा करुन त्या तरुणावर दबाव आणण्याचा तरुणीचा प्रयत्न सुरु होता. परंतु, तो युवक तिच्यासोबत जाण्यास तयार नव्हता. ही मला घरी खूप त्रास देते, असं तरुण पोलिसांना वारंवार सांगत होता. यामुळे चिडलेल्या तरुणीने पोलिसांना धक्काबुक्की केली. काही वेळानंतर वातावरण निवळले आणि तरुण, त्याचे वडिल आणि तरुणी यांच्यात तडजोड (Compromise) झाली. त्यानंतर संबंधित तरुण त्या तरुणीसोबत राहण्यास तयार झाला आणि ती तरुणी त्याला पोलीस ठाण्यातून घेऊन गेली.
First published: