जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Bhiwandi: मॅरेज ग्राउंडमध्ये भीषण आग; वऱ्हाडींचा मात्र जेवणावर ताव, पाहा VIDEO

Bhiwandi: मॅरेज ग्राउंडमध्ये भीषण आग; वऱ्हाडींचा मात्र जेवणावर ताव, पाहा VIDEO

Bhiwandi: मॅरेज ग्राउंडमध्ये भीषण आग; वऱ्हाडींचा मात्र जेवणावर ताव, पाहा VIDEO

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथे काल एका मॅरेज ग्राउंडला भीषण आग (massive fire at marriage ground) लागल्याची घटना समोर आली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

भिवंडी, 29 नोव्हेंबर: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथे काल एका मॅरेज ग्राउंडला भीषण आग (massive fire at marriage ground) लागल्याची घटना समोर आली होती. मॅरेज ग्राउंडला भीषण आग लागल्याने आयोजकांसह अग्निशमन दलाची बरीच धावपळ झाली आहे. तसेच या आगीत जवळपास पाच दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटेनत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित घटनेचे भयावह व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल (Viral video) झाले होते. त्यानंतर आता या आगीच्या घटनेसंदर्भातला एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही वऱ्हाडी मॅरेज ग्राउंडला आग लागल्यानंतर देखील लग्नातील जेवणावर ताव मारताना दिसत (Guest enjoyed their dinner Even after marriage ground catch fire) आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होतं असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

जाहिरात

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, भिवंडीतील अन्सारी मॅरेज ग्राउंडला भीषण आग लागली आहे. पण काही वऱ्हाडी मात्र लग्नातील जेवणावर ताव मारत आहेत. काही जण आगीच्या दिशेन पाहत जेवणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. हेही वाचा- ‘PM की शादी’, संजय राऊतांच्या घरी लगीनघाई; खास लग्नपत्रिका व्हायरल मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी भिवंडी परिसरातील अन्सारी मेरेज ग्राउंडला अचानक आग लागली होती. ऐन लग्न सुरू असताना ही आग लागल्याने अनेक वऱ्हाडींची धांदल उडाली होती. या दुर्घटनेत पाच दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. तर काही वऱ्हाडी आपला जीव धोक्यात घालून आपली दुचाकी वाचवण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेत दुचाकी गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री साडे अकराच्या सुमारास ही आग आटोक्यात आणली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात