मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'PM की शादी', संजय राऊतांच्या घरी लगीनघाई; खास लग्नपत्रिका व्हायरल

'PM की शादी', संजय राऊतांच्या घरी लगीनघाई; खास लग्नपत्रिका व्हायरल

PM Ki Shaadi: ऐरवी विरोधकांना थेट अंगावर घेणाऱ्या राऊत यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या लग्नपत्रिकेमधून देखील राजकीय टोला लगावण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 नोव्हेंबर: शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. ऐरवी विरोधकांना थेट अंगावर घेणाऱ्या राऊत यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या लग्नपत्रिकेमधून देखील राजकीय टोला लगावण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut wedding) हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार याच्यासोबत विवाह होणार आहे. याची जय्यत तयार राऊत कुटुंबीयांकडून केली जात आहे. त्यांचा हा विवाहसोहळा आज 29 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.

तत्पूर्वी राऊत यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची एक खास लग्नपत्रिका (Purvashi Raut wedding invitation card) तयार केली आहे. संबंधित लग्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर #PMkiShaadi असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. सध्या ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खरंतर, संजय राऊत यांच्या मुलीचं नाव पूर्वशी आणि होणाऱ्या जावयाचं नाव मल्हार आहे. संबंधित लग्नपत्रिकेवर पूर्वशी आणि मल्हार यांची नावं इंग्रजीतून टाकली आहेत.

हेही वाचा-Omicronचा धोका वाढला; परदेशातून येणाऱ्यांसाठी बदलले नियम,जाणून घ्या नवी नियमावली

योगायोग म्हणजे दोघांच्या नावाची इंग्रजीतील आद्यक्षरं P आणि M असे आहेत. याचाच फायदा घेऊन संजय राऊत यांनी आपल्या लेकीच्या लग्नपत्रिकेवर #PMkiShaadi असा हॅशटॅग वापरला आहे. लग्नपत्रिकेवरील हा हॅशटॅग सध्या जोरदार चर्चेत असून सोशल मीडियावर ही लग्नपत्रिका व्हायरल होतं आहे.

हेही वाचा-मोठी बातमी: आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता

अलीकडेच, संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे दोघं एकत्र गाण्यावर डान्स करताना आढळले होते. संबंधित व्हिडीओ देखील सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ संजय राऊत यांच्या मुलीच्या संगीत कार्यक्रमातील होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काहीजणांनी यावर टीका देखील केली होती.

First published:

Tags: Sanjay raut