मराठी बातम्या /बातम्या /पुणे /VIDEO : पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार, लहान मुलासमोर तरुणावर धारदार कोयत्याने सपासप वार

VIDEO : पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार, लहान मुलासमोर तरुणावर धारदार कोयत्याने सपासप वार

पुण्यातील रस्त्यांवर आरोपी आकाश हातात कोयता घेऊन तरुणाच्या मागे धावत होता.

पुण्यातील रस्त्यांवर आरोपी आकाश हातात कोयता घेऊन तरुणाच्या मागे धावत होता.

पुण्यातील रस्त्यांवर आरोपी आकाश हातात कोयता घेऊन तरुणाच्या मागे धावत होता.

पुणे, 12 जुलै :  पिंपरी-चिंचवडच्या चिखली भागात भर दिवसा धारधार शस्त्राने वार करत एका तरुणाची हत्या ( youth was killed by a sharp weapon in the Chikhali area of ​​Pimpri-Chinchwad) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडली त्यावेळी एक लहान मुलगाही तेथे होता. गेल्या अनेक दिवसात पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा एकदा भररस्त्यात एका तरुणाची पूर्ववैमन्यस्यातून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ही घटना घडली असून या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. कानिफनाथ क्षीरसागर या तरुणाची हत्या झाली असून आकाश उर्फ मकसुद विजय जाधव याने भररस्त्यात कोयत्याची त्याच्यावर वार केले. पुढील दोन दिवसात आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

हे ही वाचा-भारती विद्यापीठातील महिला डॉक्टरच्या बाथरूममध्ये छुपे कॅमेरे; पुण्यात एकच खळबळ

काय आहे प्रकरणं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कानिफनाथ आणि आरोपी आकाश हे दोघे आधी शेजारी राहत होते. त्यावेळी परिसरातील काही तरुणांनी आकाशला बेदम मारहाण केली होती. यामागे मृत कनिफनाथ असल्याचा आरोपीला संशय होता. या घटनेनंतर आकाशने ते घर सोडलं व तो दुसरीकडे राहायला गेला. मात्र आपल्याला मारहाण झाली व घर बदलावं लागलं याचा राग आकाशच्या मनात होता. याच रागातून आकाशने रविवारी कनिफनाथ याच्यावर हल्ला केला.

रविवारी दुपारी 1.30 च्या दरम्यान कानिफनाथला आकाशने मंडप बांधायचे काम द्यायचे असे सांगून त्याला एकांत स्थळी बोलवलं. त्यानंतर आरोपी आकाश जाधव त्या ठिकाणी आला. रस्त्यात कनिफनाथ एका व्यक्तीसोबत बोलत उभा होता. यावेळी त्याच्याजवळ एक लहान मुलगाही होता. आकाश यावेळी गुपचूप तेथे आला व त्याने पिशवीतून कोयता काढला व कनिफनाथवर हल्ला करू लागला. बेसावध असलेला कनिफनाथ पळू लागला. आकाशदेखील त्याच्या मागे पळत गेला. काही अंतरावर त्याने कनिफनाथवर कोयत्याने सपासप वार केला. त्याचा मृत्यू होत नसल्याचं पाहून आकाशने डोक्यात दगड घालून कनिफनाथची हत्या केली.

First published:

Tags: Crime news, Pune, Shocking viral video