मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /mansukh hiren death प्रकरणी मोठी बातमी, आता तपास NIA कडे, FIR दाखल करण्याचे आदेश

mansukh hiren death प्रकरणी मोठी बातमी, आता तपास NIA कडे, FIR दाखल करण्याचे आदेश

केंद्रीय गृहमंत्रायलयाने आता एक आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एनआयएने FIR दाखल

केंद्रीय गृहमंत्रायलयाने आता एक आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एनआयएने FIR दाखल

केंद्रीय गृहमंत्रायलयाने आता एक आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एनआयएने FIR दाखल

मुंबई, 20 मार्च :  मनसुख हिरेन मृत्यू  (Mansukh Hiren Death Case) प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने (central Home Ministry) या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) एनआयएला FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र एटीएसकडून (ATS) एनआयएकडे देण्यात आला आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास हा एनआयए तपास यंत्रणा करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रायलयाने आता एक आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एनआयएने FIR दाखल करावा, असे आदेश दिले आहे. या बद्दल गृहमंत्रालयाने याबद्दल नोटिफिकेशन काढले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

तब्बल 23 लाखांहून कोरोना लशीचे डोस वाया, का आणि कसे?

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएसने सचिन वाझे विरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा केला आहे.  सचिन वाझे यांचा मनसुख हत्येत हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Facebook युजर्ससाठी मोठी बातमी! आता फेसबुक वापरण्यापूर्वी करावं लागेल हे काम

सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे  सचिन वाझेंचा ताबा मिळावा अशी मागमी एटीएसने ठाणे न्यायालयात केली आहे.  एटीएसने 4 पाणी अहवालात न्यायालयात सादर केला होता. तसंच NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता ATS ने ठाणे कोर्टातून परवानगी मिळवली आहे. पण, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

सचिन वाझेंना घटनास्थळावर चालवले

तर मुंबईत (Mumbai) स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने (NIA) कार मायकल रोड (Mumbai Carmichael Road) घटनास्थळावर घेऊन गेले होते. ज्या दिवशी स्फोटकं ठेवण्यात आली होती त्याच रात्री पीपीई कीट (PPE kit) घातलेली एक व्यक्ती कार मायकल रोडवरुन फेरफटका मारत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे एनआयएच्या पथकाने सचिन वाझे यांना घेऊन शुक्रवारी रात्री घटनास्थळावर नाट्यरुपांतर केलं. सचिन वाझे यांना एक पीपीई कीट सारखे जॅकेट घालण्यात आले होते. त्यांना स्फोटकांनी कार ठेवलेल्या ठिकाणावर चालण्यात सांगण्यात आले. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

VIDEO: मुंबईत मास्क न घातल्यानं दंड मागितला असता महिलेची मार्शलला जबरदस्त मारहाण

कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती ही सचिन वाझे असावेत असा संशय NIA ला आहे. त्यामुळे या घटनेचा तपास करण्याकरता सचिन वाझे यांना त्याच मायकल रोडवर, त्याच ठिकाणी त्याच वेळेत. तशाच पद्धतीने पीपीई कीट घालून चालण्यास सांगणार आले. जेणेकरून सचिन वाझे यांची चालण्याची पद्धत आणि पीपीई कीट घातलेल्या व्यक्तीची चालण्याची पद्धत एकच आहे का? हे तपासले जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: ATS, Complaint, Maharashtra, Mumbai, National Investigation Agency, Nia, Sachin vaze