मुंबईमध्ये मास्क न घातल्यास 200 रुपयांचा दंड आहे. मात्र, तरीही या महिलेनं आपली चूक मान्य न करता मार्शलवरच हल्ला केला आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होत आहे. अशात नागरिकांच्या याच हलगर्जीपणामुळं कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं होत आहे. राज्यात शुक्रवारी 25,681 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 24,22,021 इतकी झाली आहे. तर, शुक्रवारी कोरोनामुळे सत्तर जणांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंतचा मृतांचा आकडा 53,208 वर पोहोचला आहे. राज्यात गुरुवारी 25,833 नवे कोरोना रुग्ण आढळले होते आणि दररोज येणाऱ्या रुग्णसंख्येचा हा एक नवा रेकॉर्ड होता. मुंबईबद्दल बोलायचं झाल्यास मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवे 3,062 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या वाढून 3,55,897 वर पोहोचली आहे.मुंबईत मास्क न घातल्यानं दंड मागितला असता महिलेकडून मार्शलला मारहाण pic.twitter.com/mj4xxMLfSD
— News18Lokmat (@News18lokmat) March 20, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC, Live video viral, Shocking viral video