मुंबई, 30 मार्च : दक्षिण मुंबईतील कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी (Scorpio car) आता आणखी एक धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारा खुलासा झाला आहे. कारण आतापर्यंत या प्रकरणातील एकमेव साक्षीदार तसंच सचिन वाझे (Sachin Vaze) याचा जवळचा मित्र मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी (Mansukh Hiren death Case) वेगवेगळ्या थेअरी समोर आल्या होत्या. पण एनआयएच्या NIA तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, 4 मार्च रात्री मनसुख हिरेन ठाण्यातून आपल्या क्लासिक डेकॉर या दुकानातून घरी निघाला. यावेळेस त्याला त्याच्या मुलाने विचारलं 'इतक्या लवकर कुठे निघालात?, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं 'मला एक अर्जंट काम आहे, जावं लागेल. स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या गाडी संदर्भात चौकशीसाठी मला जावं लागणार आहे.' तिथून मनसुख त्यांच्या नौपाडा येथील विकास पाम या सोसायटीत गेले आणि लगबगीनं जेवून मनसुख साडेआठच्या सुमारास घरातून निघाले.
बंदीला चॅलेंज! डोनाल्ड ट्रम्प सुरू करणार स्वत:ची सोशल मीडिया साईट
यावेळेस घरच्यांना विचारले असता, 'कांदिवली क्राइम ब्रांचच्या तावडे नावाचे अधिकारी यांनी मला तपासा करता बोलावलं असून त्याकरता मी निघालोय' असं सांगून मनसुख निघाले. मात्र रात्री 10.30 वाजेनंतर मनसुख यांचा फोन बंद झाला. त्यामुळे घरच्यांची चिंता वाढू लागली तर 5 मार्चच्या सकाळी 10.25 मिनिटांनी ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख यांचा मृतदेह सापडला आणि हिरेन कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली.
4 मार्चच्या रात्री दहा वाजेपासून ते 5 मार्चच्या सकाळी 10.30 वाजेपर्यंत मनसुख सोबत नेमकं काय घडलं? याबाबत तपास केला त्यात धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र, एनआयएने केलेल्या चौकशीत आणि तपासात आता एक हृदय हेलावून टाकणारी ही माहिती समोर आली आहे.
4 मार्चला मनसुख व्हॉट्सअप कॉल वरून कोणाच्या तरी सतत संपर्कात होता आणि एक टप्पा आल्यावर मनसुख पूर्ण संपर्क झाला होता. मनसुख यांना बेशुद्ध करण्यात आलं होतं. ठाण्यातील गायमुख चौपाटी येथे पण बेशुद्ध करण्यात आलं होतं आणि एका गाडीत टाकून मनसुख यांना गायमुख चौपाटी ते मुंब्रा रेतीबंदर असं एका गाडीत नेण्यात आलं तर ही गाडी सचिन वाझे यांची होती आणि आश्चर्य म्हणजे दोन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या वेळेस गाडीला संरक्षण दिलं होतं आणि या दोन पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या संरक्षणात बेशुद्धावस्थेत असलेल्या मनसुख यांना मुंब्रा रेतीबंदर खाडीपर्यंत पोचवले. या दोन पोलीस निरीक्षकांनी सचिन वाझेंच्या गाडीला संरक्षण दिले कारण जर गायमुख चौपाटी ते मुंब्रा रेतीबंदर यादरम्यान जर पोलीस बंदोबस्त अथवा नाकाबंदी असती आणि या दरम्यान बेशुद्धावस्थेतील मनसुख ज्या गाडीत आहे. त्या गाडीला पोलिसांनी अडवले असते तर ती गाडी चेक न होता पुढे सोडली जावे, याकरता या दोन पोलीस निरीक्षकांनी गाडीला संरक्षण दिले होते.
तर दुसरीकडे याच दरम्यान सचिन वाझे यांचा मोबाईल मुंबई पोलीस आयुक्तालयातील सीआययु या मुंबई क्राईम ब्रँच या कार्यालयात ठेवला होता. कारण मनसुख यांचा मृत्यू केव्हा झाला व मनसुखसोबत जे काही घडलं त्यावेळेस आपण तिथे नव्हतो हे दाखवण्याकरता सचिन वाझे याने आपला मोबाइल मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयातील सीआययु ऑफिसमध्ये ठेवला आणि तिथे पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याला त्या मोबाईलची देखरेख करण्यास ठेवण्यात आले होते.
तसंच जर कोणाचा फोन आला तर 'सचिन वाझे बिझी आहेत' असं त्या पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला सांगण्यात आलं होतं. तपासात हे सर्व समोर आल्यानंतर एनआयएने सचिन वाझे यांचा 4 मार्च आणि 5 मार्च या दोन दिवसांचा सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड काढला असता 4 मार्च रात्री आणि 5 मार्च या काळात सचिन वाजे याला एकही फोन आला नसून फक्त जाहिरातीचे आठ मेसेज आले होते. याचा अर्थ मनसुख यांची हत्येतून वाचवण्याकरता सचिन वाजे आणि टीमने लोकेशन डिफरन्स सी या प्रकारचा खेळ खेळला होता.
पण लोकेशन व्यतिरिक्त तपास यंत्रणांकडे सचिन वाझे याच्या विरोधात इतके भक्कम पुरावे आहेत की लोकेशन डिफरेन्स पुरावे नष्ट करणे तपास यंत्रणांची दिशाभूल करणे हे सर्व खेळ सचिन वाझे याने खेळले असतील तरी येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATS, Hiren mansukh, Nia, Sachin vaze, मुंबई पोलीस