संगीत क्षेत्राला मोठा धक्का! प्रसिद्ध गायकाचा कार अपघातात मृत्यू; वेगाने घेतला जीव

संगीत क्षेत्राला मोठा धक्का! प्रसिद्ध गायकाचा कार अपघातात मृत्यू; वेगाने घेतला जीव

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजानचं (punjabi singer diljaan died in car accident) नवं गाणं 2 एप्रिलला रिलीज होणार होतं.

  • Share this:

चंदीगड, 30 मार्च :  संगीत क्षेत्राला हादरवणारी घटना. प्रसिद्ध गायक दिलजानचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. वेगाने दिलजानचा जीव घेतला (Punjabi singer Diljaan died in car accident) आहे. पंजाबमध्ये  मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. दिलजान घरी परतत असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला. त्याच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिलजान करतारपूरचा राहणारा आहे. अमृतसरहून तो करतारपूरला आपल्या घरी जात होता. त्यावेळी त्याच्या कारला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दिलजानने जागीच श्वास सोडला.

जंडियाला गुरूजवळ ही दुर्घटना घडली. दिलजान यांची कार वेगात असल्याचं सांगितलं जातं आहे. अति वेगामुळे कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला जाऊन धडकली. घटनास्थळी दाखल असलेल्या लोकांनी दिलजानला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दिलजान त्यावेळी गाडीत एकटाच होता.

हे वाचा - 'आजोबांनी केलं होतं लैंगिक शोषण, बहिणीलाही सोडलं नाही,' अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

दिलजान रिअॅलिटी शो आवाज पंजाब दीमध्ये होता. याशिवाय पाकिस्तानी रिअॅलिटी शो सुरक्षेत्रमध्येतही तो स्पर्धक होता. सुरक्षेत्रमधील दिलजानची गाणी ऐकून प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंच्या डोळ्यातही पाणी आलं होतं.

2 एप्रिलला दिलजानचं गीत तेरे वरगे नवं गाणं रिलीज होणार होतं आणि त्यासाठीच तो अमृतसरला गेला होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वांना झटका बसला आहे.

Published by: Priya Lad
First published: March 30, 2021, 3:48 PM IST

ताज्या बातम्या