• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Maharashtra Unlock : प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

Maharashtra Unlock : प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

file photo

file photo

सर्व नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांचं पालन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

 • Share this:
  मुंबई, 25 सप्टेंबर : देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक (Maharashtra Unlock) होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं (Maharashtra temples reopen) सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांनी शुक्रवारी घेतला. म्हणजेच, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आता राज्यातली मंदिरं आणि इतर प्रार्थनास्थळं दर्शनासाठी (Maharashtra temples opening date) उघणार आहेत. या वेळी सर्व नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचं पालन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्यातली प्रार्थनागृहे खुली करण्यात आली होती; मात्र या वर्षी मार्चमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Maharashtra corona wave) प्रार्थनास्थळं पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. आता दुसरी लाटही ओसरली असून, राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या (Maharashtra corona cases) कमी होताना दिसत आहे. त्यामुळे प्रार्थनास्थळांसोबत इतर गोष्टींवरचे निर्बंधही (Maharashtra restrictions lifted) शिथिल करण्यात येत आहेत. राज्यात कधीपासून काय सुरू होईल याची यादी आपण पाहू या.. 15 ऑगस्टपासूनच राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आणि पूर्ण लसीकरण होऊन 14 दिवस झालेल्या व्यक्तींसाठी लोकल (Mumbai local new rules) सेवा पूर्ववत केली आहे. हे ही वाचा-Maharashtra Cinema Hall reopen: राज्यातील थिएटर्स सुरू होणार राज्यातली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी तिथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असणं अनिवार्य आहे. अशा प्रकारे हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू (Maharashtra hotel rules) ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. पार्सल सुविधा 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांसोबतच इतर दुकानंही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी दुकानातल्या कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं असणं अनिवार्य आहे. व्यायामगृहं, योगकेंद्रं, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेसह सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुकानातल्या कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण अनिवार्य आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या 25 टक्के क्षमतेसह कार्यालयं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी कार्यालयांना 24 तास काम सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कार्यालयातल्या लग्न समारंभांसाठी निमंत्रितांची मर्यादा (Maharashtra marriage function restrictions) 50 वरून वाढवून जास्तीत जास्त 100 करण्यात आली आहे. तसंच, ओपन एअर हॉलमधल्या निमंत्रितांची संख्या जास्तीत जास्त 200 पर्यंत ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्क्वॉश, पॅरालल बार, मल्लखांब अशा प्रकारच्या सर्व इनडोअर खेळांसाठी एकावेळी केवळ दोनच खेळाडू अशा अटीसह परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी असणारे सर्व जण, म्हणजेच खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचारी या सर्वांचं पूर्ण लसीकरण झालेलं असणं अनिवार्य आहे. चार ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळाही (Maharashtra Schools reopen) सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातले 5वी ते 12वी पर्यंतचे आणि शहरी भागातले 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यासोबतच, राज्यातली चित्रपटगृहं (Maharashtra Theatres reopen) आणि मल्टिप्लेक्स 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. राज्याची अर्थव्यवस्था पाहता, महाराष्ट्रात आता पूर्ण लॉकडाउन लागू करण्यात येणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. गणपती उत्सवादरम्यान महाराष्ट्र सरकारने काही जास्तीचे निर्बंध लागू केले होते: मात्र आता तेदेखील मागे घेण्यात आले आहेत.
  First published: