Home /News /mumbai /

Maharashtra Cinema Hall reopen: 22 ऑक्टोबरपासून राज्यातील थिएटर्स सुरू होणार

Maharashtra Cinema Hall reopen: 22 ऑक्टोबरपासून राज्यातील थिएटर्स सुरू होणार

Maharashtra Cinema Hall reopen: राज्यातील थिएटर्स पुन्हा सुरू कऱण्याच्या संदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 25 सप्टेंबर : महाराष्ट्रातील थिएटर्स आता सुरू (Maharashtra theaters reopen) होणार आहेत.  राज्यातील चित्रपटगृहे (Cinema Halls) 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी (SOP for theaters reopen) तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली नवरात्रीपासून मंदिरे सुरू नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये. 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू  राज्यातील शाळा अखेर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करणे शक्य असल्यास क्लिनिक सुरू करावे विद्यार्थ्यांचे नियमितपणे टेम्परेचर तपासावे शक्य असल्यास यासाठी इच्चूक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी सर्व शाळा आरोग्य केंद्रांशी संलग्न कराव्यात. हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर आणि परिचारीकांची मदत घ्यावी. उपरोक्त कामासाटी CSR किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्यात यावा. शालेत येताना घ्यावयाची काळजी मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे. ज्या शाळांमध्ये स्कूल बस, खाजगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घेण्यात यावी. विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालक / वाहक यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सूचना जेवण आणि इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात. विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत निर्देश द्यावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही. वेळ असल्यास गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करुन घ्यावा.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra

    पुढील बातम्या