• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Maharashtra unlock: 25 जिल्ह्यांत निर्बंध शिथिल होणार; लोकल, मॉल्स, थिएटर सुरू होणार ?

Maharashtra unlock: 25 जिल्ह्यांत निर्बंध शिथिल होणार; लोकल, मॉल्स, थिएटर सुरू होणार ?

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट असरत असून अनेक जिल्ह्यांत कोविड रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचं पहायला मिळत आहे.

 • Share this:
  मुंबई, 31 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्याची मागणी होत आहे. निर्बंध शिथिल करण्याच्या संदर्भात राज्य सरकार (Maharashtra Government) सकारात्मक असून या संदर्भात नवी नियमावली (New guidelines) आज जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत टास्क फोर्समधील काही तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले मत मांडत म्हटले की ज्या जिल्ह्यांत रुग्णसंख्या आटोक्यात आहे तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात यावेत तर 15 ऑगस्टपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण मुभा देण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात याावा. निर्बंध शिथिल होण्याच्या संदर्भात नवी नियमावली आज जाहीर होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या नियमावलीत ज्या 25 जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या नगण्य आहे अशा ठिकाणी मॉल्स, थिएटर सुरू करण्यास राज्य सरकार परवानगी देऊ शकते. तर दुकाने सुरू ठेवण्याची वेळ दुपारी 4 पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाढवून देण्याची शक्यता आहे. Maharashtra Unlock Updates: टास्क फोर्समधील डॉक्टरांनी मांडले 'हे' मत; मुख्यमंत्री काय घेणार निर्णय? लोकल संदर्भात काय निर्णय होणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने विचार सुरू आहे. ज्यांना लसींचे दोन डोस दिले आहेत त्यांना प्रवासाची परवानगी द्यायची का? पण हे करायचं झालं तर तितकी तपासणी यंत्रणा आहे का? रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा करुन मुख्यमंत्री स्तरावर घेतला जाईल. त्यामुळे आता राज्य सरकार लोकल ट्रेन संदर्भात काय निर्णय घेतं हे पहावं लागेल. 25 जिल्हे होणार अनलॉक? राज्यातील 25 जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्य़ा चांगल्या प्रकारे आटोक्यात आली आहे. या जिल्ह्यांत रुग्णसंख्या खूपच कमी आहे. या जिल्ह्यांत निर्बंध पूर्णपणे हटवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता राज्य सरकार पूर्णपणे निर्बंध हटवण्याची शक्यता कमी असून निर्बंधांत शिथिलता देण्याची शक्यता आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: