मुंबई, 08 ऑगस्ट : कोरोनाबाधित रुग्णांची (maharashta corona case) संख्या आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आले. पण, दुसरीकडे मंदिरं, लोकल सुरू करण्याबाबत भाजपने आंदोलन केले होते. 'हे उघडा ते उघडा काही जण म्हणत आहे. महाराष्ट्रातील काही घटक लोकांची माथी भडकावत आहे. पण महाराष्ट्रातील जनतेनं अशा उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला.
मुंबईची लोकल सेवा अखेर 15 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. पण, त्याआधी भाजपच्या आमदारांनी मुंबईतील लोकल स्थानकांवर आंदोलनं केली होती. त्यानंतर राज्य सरकारने याबद्दल आढावा बैठक घेतली होती. आज जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला.
सॉफ्ट स्किल्स म्हणजे नक्की काय? टॉप सॉफ्ट स्किल्स जे तुमच्यामध्ये असणं आवश्यक
'हे उघडा ते उघडा, असं काही जण म्हणत आहे. महाराष्ट्रातील काही घटक लोकांची माथी भडकावत आहे. पण महाराष्ट्रातील जनतेनं अशा उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये, महाराष्ट्र मॉडेल आणि मुंबई मॉडेलचं कौतुक होत आहे. हे कौतुक आमचं नाहीतर जनतेचं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
तसंच, दुकानं खुली ठेवावी अशी मागणी होत आहे. मी तर म्हणतो २४ तास दुकानं उघडी ठेवूया, पण कामाच्या वेळेत बदल करावा लागणार आहे. जिथे गर्दी वाढली तिथे रुग्ण वाढले आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, मंदिर खुली करण्यासाठी ८ दिवस लागणार आहे. कोरोना गेला आहे, तर दुकानं उघडा अशी मागणी करत आहे. आता लोकांचा संयम सुटत चालला आहे. पण, संयम ठेवावा लागणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख, दुसऱ्या लाटेत ४० लाख लोक बाधित झाले असून तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी त्यादृष्टीने राज्य शासनाने आपली तयारी केल्याचे स्पष्ट केले. आधी आपल्याकडे २ चाचणी प्रयोगशाळा होत्या, आता त्याची संख्या आता ६०० वर गेली आहे. विलगीकरण रुग्णशैय्यांची संख्या ४.५ लाखांहून अधिक केल्याची माहिती दिली. राज्यात आयसीयुच्या ३४ हजार ५०७ तर ऑक्सीजनच्या १ लाख १० हजार ६८३ खाटा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. १३५०० व्हेंटिलेटर्स आपल्याकडे आहेत असेही ते म्हणाले.
...अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल
राज्याची ऑक्सीजन निर्मिती आजही १३०० मे.टन दर दिवशी आहे. गेल्यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १७००/१८०० मे.टन ऑक्सीजन दररोज लागला. आपण ऑक्सीजन स्वावलंबन धोरण राबवित असलो तरी तातडीने ऑक्सिजन निर्मितीला मर्यादा आहेत. इतर राज्यात आता पुन्हा रुग्णवाढ दिसू लागली आहे. त्याचा अंदाज घेऊन राज्यात पुन्हा रुग्णवाढ झाली तर नाईलाजाने लॉकडाऊन करावे लागेल, असंहीही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
काही ठिकाणी निर्बंध शिथील पण...
राज्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली अशा काही जिल्ह्यात अजून कोरोना संसर्ग वाढता आहे ते जिल्हे सोडून उर्वरित ठिकाणी काही निर्बंध शिथील केले आहेत. कोरोनामुक्त गावासारखी संकल्पना आपण राबवित आहोत. अनेकांनी यादिशेने योग्य पाऊले टाकायला सुरुवातही केली आहे. उद्योजक, कंपन्यांनी आपल्या कामाच्या वेळा बदलून शिफ्टमध्ये कामगारांना बोलवावे, शक्य असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची सोय त्यांच्या कॅम्पसमध्येच करावी, अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात ४ कोटी ६३ लाख ७६ हजार नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ४५ लाख ३० हजार ७१९ आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार १०७ आहे. पहिला डोस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.