• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • रोज 1.5 लाख खर्च; 30 वर्षांच्या मुलाला वाचविण्यासाठी आईची धावपळ; गेल्या 2 महिन्यांपासून लंग सपोर्ट मशीनवर

रोज 1.5 लाख खर्च; 30 वर्षांच्या मुलाला वाचविण्यासाठी आईची धावपळ; गेल्या 2 महिन्यांपासून लंग सपोर्ट मशीनवर

या कुटुंबाने आधीच 40 लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र आणखी एका महिन्यासाठी डॉक्टरांनी 40लाखांची मागणी केली आहे.

 • Share this:
  कलकत्ता, 8 ऑगस्ट : कोविडमुळे (Coronavirus) केवळ लोकांचं आयुष्यचं हिरावून घेतलं नाही तर अनेक कुटुंबाला आर्थिक संकटात टाकलं आहे. हजारो कुटुंबीय आपल्या नातेवाईकांचा जीव वाचविण्यासाठी इथून-तिथून पैसे जमा करीत आहेत. कलकत्त्यात 30 वर्षीय जीतपाल सिंघा एक महिन्याहून अधिक कालापासून ईसीएमओ या रुग्णावयात लाइफ सपोर्ट मशीनवर आहे. याचा खर्च दीड लाख रुपये प्रतिदिन आहे. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितलं की, डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितलं की, त्याला पुढील 30 दिवस आणि त्याच मशीनवर ठेवण्याची गरज आहे. त्यांचे साठवलेले पैसेही संपले आहेत. त्यांचे कुटुंबीय उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी संघर्ष करीत आहे. (Corona Treatment) त्यांची आई अल्पना सिंघा यांनी सांगितलं की, मुलाच्या गळ्यात पाइप असल्याने तो बोलू शकत नाही. आई आपल्या मुलाला वाचविण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्यांचा एकूलता एक मुलगा गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालयात आहे. ईसीएमओ मशीनवर पुढील 30 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी दीड लाख रुपये म्हणजे तब्बल 40 लाखांचा गरज आहे. दुसरीकडे जीतपाल याचे मित्र त्याच्यासाठी पैसे जमा करीत आहे. (Spend one and a half lakh per day; Mother's rush to save 30-year-old child; Lung support machine for the last 2 months) हे ही वाचा-लसीकरणात भारतानं ओलांडला 50 कोटींचा टप्पा; PM मोदींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले जीतपाल देहरादूरच्या शाळेत शिकला, त्यानंतर तो कलकत्ता, ब्रिटेन आणि अमेरिकेत राहिला आहे. येथील त्याची मित्रमंडळी त्याच्या मदतीसाठी पुढे आली आहेत. त्यांनी तब्बल 40 लाख रुपये जमा केले होते. मात्र ते आता संपत आहेत. जीतपाल याच्या वडिलांचा छोटासा व्यवसाय आहे. त्यांची काही संपत्ती आहे. मात्र ती आता विकण्यास खूप अडचणी येत आहे. डॉक्टर म्हणाले की, तुमच्याकडे 40 लाख रुपये असणं गरजेचं आहे. मात्र आधीच 40 लाख रुपये खर्च झाले आहेत. आता काय करू शकतो, अशी भावना जीतपाल याच्या चुलत भावाने व्यक्त केली. देशातील अनेक कुटुंब आज जीतपालच्या आई-वडिलांप्रमाणे अडचणीचा सामना करीत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: