मुंबई 13 मार्च : महाराष्ट्रातल्या राज्यसभा निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीतर्फे चार उमेदवार तर भाजपने तीन जणांना उमेदवारी घोषित केली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही शुक्रवार आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार आघाडीचे चार तर भाजपचे तीन जण निवडून येऊ शकतात. त्यामुळे ही निवडणूक ही बिनविरोध होण्याचीच शक्यता आहे. आघीडीत चवथ्या जागेवर काँग्रेसनेही आपला दावा केला होता. मात्र काँग्रेसवर मुत्सद्देपणाने मात करून शरद पवारांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. काँग्रेसला चवथी जागा न मिळता ती जागा राष्ट्रवादीनेच पदरात पाडून घेतली. राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना उमेदवारी मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं असलं तरी खरी सूत्रं ही शरद पवारांच्या हातात आहे अशी टीका केली जाते. पवारांसहीत महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी ही टीका फेटाळून लावली आहे. मात्र सूत्र पवारांच्या हातात नसली तरी पवारांच्या शब्दाला सर्वाधिक वजन असल्याचं प्रत्येक वेळी दिसून आलं. राष्ट्रवादीचे 54 आमदार असल्याने त्यांच्याकडे मतांची टक्केवारी जास्त होती. त्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसला दबाव झुगारला. असे आहे आमदारांचे संख्याबळ भाजप 105 शिवसेना 56 राष्ट्रवादी 54 काँग्रेस 44 मी फक्त सल्ला देण्याचं काम करतो. एकदा विश्वास टाकल्यानंतर त्यांना काम करू दिलं पाहिजे. आणि मागितला तरच सल्ला दिला पाहिजे. नव्या लोकांना फक्त दिशा द्यावी. तरच किंमत राहाते. तुम्ही सतत सांगत गेला तर मग किंमत राहात नाही असंही पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘तमाशा’लाही बसला ‘कोरोना’चा फटका, बारी ठरवण्यासाठी गावपुढारी फिरकेना मात्र सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी पवारांचे उत्तम संबंध आहेत. पवारांनीच पुढाकार घेतल्याने महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. मंत्रिमंडळाची रचना होत असतानाच राष्ट्रवादीने महत्त्वाची खाती पदरात पाडून घेतली होती. त्यावेळीही महत्त्वाचं आणखी एक खातं मिळावं यासाठी काँग्रेसने जोर लावला होता. हे वाचा… ‘शिवज्योत’शिवनेरीवरून आणताना अपघात, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.