जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शिवज्योत' शिवनेरीवरून आणताना अपघात, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

'शिवज्योत' शिवनेरीवरून आणताना अपघात, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

'शिवज्योत' शिवनेरीवरून आणताना अपघात, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

वेगात असलेल्या गाडीतून पडल्याने त्याला जास्त लागलं होतं. त्याच्या सोबत असलेल्या लोकांनी त्याला तातडीनं ओतुरमधल्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

जुन्नर 13 मार्च : सर्व राज्यात शिवजयंती गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना आणि काही संघटना तिथिनुसार असलेली ही शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करतात. यानिमित्त किल्ले शिवनेरीवर विशेष कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं असतं. त्याचप्रमाणे यावर्षीही शिवनेरीवर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. काही संघटना आपल्या गावातून शिवज्योत घेऊन शिवनेरीवर येत असतात. अशा एका गटासोबत आलेला एक मुलगा किल्ल्यावरून परतत असताना अपघातात मृत्यूमुखी पडला. प्रतिक उमेश शिंगोटे असं त्या मुलाचं नाव असून तो 12 वर्षांचा आहे. प्रतिक हा जुन्नर तालुक्यातल्या खामुंडी गावातला राहणार होता. गावातल्या लोकांसोबत तो शिवनेरीवर शिवज्योत घेऊन आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर ती सगळी मंडळी ही एका टेम्पोतून गावाकडे परतत होती. जुन्नर बनकरफाटा इथं त्यांचा टेम्पो आलेला असताना प्रतिक हा टेम्पोतून खाली पडला. वेगात असलेल्या गाडीतून पडल्याने त्याला जास्त लागलं होतं. त्याच्या सोबत असलेल्या लोकांनी त्याला तातडीनं ओतुरमधल्या हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र उपाचारादरम्यान प्रतिकचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत ओतूर पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद घेऊन,नंतर अपघात ठिकाण  जुन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोन्याचे दर तब्बल 2600 रुपयांनी घटले, हे आहेत जळगाव सराफा बाजारातील नवे दर १९ फेबुवारी रोजी शासकीय शिवजयंतीला किल्ले हडसर येथून कड्यावरून पडून एका २० वर्षीय युवतीचा मृत्यू झाला होता.कड्यावरून खाली पडल्याने तिचा मृतदेह छिन्नविछिन्न होऊन दुर्घटना घडली होती. तशीच दुर्देवी घटना घडल्याने परिसरात दुखःव्यक्त होत आहे. हेही वाचा… ‘आमच्याच पक्षाच्या नेत्यांकडून शब्द फिरवला गेला’, सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर

पुण्यातील गाडगीळ सराफ 50 कोटी खंडणी प्रकरण, अजित पवारांच्या निकटवर्तीयांची चौकशी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident
  • First Published :
जाहिरात
जाहिरात