जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / आम्ही काय गोट्या खेळायला बसलो होतो का? संजय राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारले

आम्ही काय गोट्या खेळायला बसलो होतो का? संजय राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारले

आम्ही काय गोट्या खेळायला बसलो होतो का? संजय राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारले

युतीमध्ये असताना माझ्यासोबत एकेकाळचे सहकारी होते. ते खालच्या थराला जाऊन टीका करत होते. ते अशोभनीय आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 नोव्हेंबर : अवघ्या 78 तासांमध्ये फडणवीस सरकार कोसळलं. देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर एकच हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागणारच होता. युतीमध्ये असताना माझ्यासोबत एकेकाळचे सहकारी होते. ते खालच्या थराला जाऊन टीका करत होते. ते अशोभनीय आहे. राजकारणात पडद्यामागे बऱ्याच काही गोष्टी घडत होत्या. पण भाजपच्या काही नेत्यांना असं वाटतंय की, आम्हीच काय ते राजकारण करू शकतो. मग काय आम्ही इथं गोट्या खेळायला बसलो नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप नेत्यांवर पलटवार केला. भाजपने अत्यंत बेईमान पद्धतीने येऊन सरकार स्थापन केलं. शिवसेनेला फसवलं ती पहिली बेईमानी. दुसरा गुन्हा बहुमत नसताना काळोखात जाऊन सरकार स्थापन केलं. आणि तिसरा अपराध कालपर्यंत तुम्ही आमच्याकडे बहुमत आहे असं सांगत होता. यासाठी चौकडी नेमली होती. त्यांची वक्तव्य पाहिलं तर जणू महाराष्ट्र विकत काढला होता. केंद्रातून थैल्या भरून पैसे दिले जात होते. पण आता याचा फुगा फुटला आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. ‘भाजपला शरद पवार समजणार नाही’ मी शरद पवार यांना जास्त ओळखतो. शरद पवार यांच्या नेतृत्त्वावर कुणी कितीही टीका केली असली तरी त्यांचं राजकारण हे महाराष्ट्रासाठी सकारात्मक होतं आणि आहे. आमच्या त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. शरद पवारांचं राजकारण भाजपला कधीच समजणार नाही. पवार यांचा विकासाचा दृष्टीकोन कुणाला समजणार नाही. तेच सर्वात मोठे नेते आहे. नेपथ्य आणि दिग्दर्शन हे शरद पवार यांचं होतं. शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावं ही शिवसेनेची भूमिका आहे, असंही राऊत म्हणाले. अजित पवार परत येतील का? अजित पवार हे महाविकासआघाडीमध्ये परत येतील का? असा सवाल केला असता, ‘हा निर्णय शरद पवार यांचा आहे. ते त्यांच्या कुटुंबातील एक आहे. त्यांच्याबद्दलाचा निर्णय हा शरद पवारच घेतील,’ असं राऊत यांनी स्पष्ट केलं. ‘सेनाच करणार नेतृत्त्व’ सरकारचं नेतृत्व शिवसेना करणार आहे. सरकार स्थापनेचा दावा शिवसेना करणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला समर्थन देण्याचं पत्र दिलं आहे. 170 बहुमताचा आकडा आज आमच्याकडे आहे. चंद्रकांत पाटील, फडणवीस असतील त्यांना माझ्यावर शंका होती. आता त्यांनी आमचं बहुमतच पाहावं, असं थेट आव्हानही राऊत यांनी दिलं. शिवतीर्थावर शपथविधी सोहळा आता राज्यपाल हे कालपर्यंत भाजप कार्यकर्त्याच्या भूमिकेत होते. आता ते दबावातून बाहेर आले असतील. त्यामुळे आम्हाला बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्नच नाही. आता आम्ही सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. शिवतीर्थावर सेनेच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. ==========

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात