मुंबई, 30 जून : उद्धव ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे. भाजपमध्ये नव्या सरकारसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.यापूर्वी शिवसेनेसोबत युती करून फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. आता शिवसेनेतीलच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासोबत भाजपा सत्तास्थापनेसाठी युती करणार आहे. भाजपा सरकारला शिंदे गटाच्या 50 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या गटाला मंत्रिमंडळात मोठं प्रतिनिधित्व मिळणार आहे. शिंदे गटाचे मंत्री कोण? राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपाचे 28 तर शिंदे गटाचे 12 मंत्री असतील. एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, दीपक केसरकर, शंभूराज देसाई या शिंदे गटाच्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. तर बच्चू कडू, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ आणि भारत गोगावले या शिंदे गटातील मंत्र्यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपामधून मंत्री कोण? भारतीय जनता पक्षामध्ये मंत्रिपदासाठी मोठी चुरस आहे. कॅबिनेट मंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं कॅबिनेट मंत्रिपदासाठी नक्की मानली जात आहेत. त्याचबरोबर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, संभाजी पाटील निलंगेकर यांचीही नावं कॅबिनेट मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर राज्यमंत्रीपदासाठी नितेश राणे, प्रशांत ठाकूर, मदन येरावर, निलय नाईक, गोपीचंद पडाळकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. संभाव्य कॅबिनेट मंत्री देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) चंद्रकात पाटील सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन आशिष शेलार प्रवीण दरेकर प्रसाद लाड मंगलप्रभात लोढा रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील संभाजी पाटील निलंगेकर एकनाथ शिंदे गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे अब्दुल सत्तार संजय राठोड शंभूराज देसाई दीपक केसरकर देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का? संभाव्य राज्यमंत्री नितेश राणे प्रशांत ठाकूर मदन येरावार निलय नाईक गोपीचंद पडळकर बच्चू कडू अब्दुल सत्तार संदीपान भूमरे संजय शिरसाट भरत गोगावले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







