जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?

देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?

देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?

देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना (Pankaja Munde) मंत्रीपद मिळणार का? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जून : राज्यात आठवडाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार पायउतार झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांच्य राजीनाम्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्या युतीचे सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री होणार हे देखील स्पष्ट आहे. त्याचबरोबर नव्या सरकारमध्ये कोण मंत्री असणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. कुणाला मिळणार संधी? फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाला 12 मंत्रिपद मिळणार असं मानलं जात आहे. मावळत्या ठाकरे सरकारमध्ये या गटाचे 5 मंत्री होते. शिंदे यांना 50 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना नव्या मंत्रिमंडळात देखील पुरेशी संधी मिळणार हे नक्की आहे. शिंदे गटामधील विदर्भातील आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राठोड हे ओबीसी समाजातील नेते असून ते ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. त्यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. नव्या मंत्रिमंडळात राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असं मानलं जातंय. पंकजांचे भवितव्य काय? ओबीसी नेते संजय राठोड मंत्री हे मंत्री झाले तर  भाजपामधील प्रभावशाली ओबीसी नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)  यांना मंत्रीपद मिळणार का? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागलं आहे. पंकजा या मराठवाड्यातील भाजपाच्या प्रभावशाली नेत्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा त्यांना वारसा आहे. बीड जिल्हा आणि शेजारील मतदारसंघावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. या सर्वानंतरही त्यांचा मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.पंकजांच्या राजकीय कारकिर्दीला हा पराभव म्हणजे मोठा सेटबॅक मानला जातो. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपनं पुढील लक्ष्य ठरलं! मुंबई भाजपचं ट्वीट चर्चेत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा यांना भाजपाने राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांना तिकीट मिळाले नव्हते. सध्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य नसलेल्या पंकजा यांना भाजपा नव्या मंत्रिमंडळात संधी देणार का? हा खरा प्रश्न आहे. पंकजांना शह देण्यासाठी संजय राठोड यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे आणले जात आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात