Home /News /mumbai /

ते फेक पत्र खरं ठरलं, राज्यपालांनी ठरल्याप्रमाणेच दिले आदेश

ते फेक पत्र खरं ठरलं, राज्यपालांनी ठरल्याप्रमाणेच दिले आदेश

पण, पत्रावर राज्यपालांची सही नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता

पण, पत्रावर राज्यपालांची सही नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता

पण, पत्रावर राज्यपालांची सही नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता

    मुंबई, २९ जून : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राजकीय नाट्याचा आता अखेरचा अंक लिहिला जात आहे. राज्यपालांनी (Governor Bhagat Singh Koshyari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहे.पण,मंगळवारी रात्रीच एक पत्र समोर आले होते. या पत्रातही ३० जून हीच तारीख होती. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. अशातच मंगळवारी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज्यपालांच्या भेटीला पोहोचले होते. तासभर राज्यपालांसोबत चर्चा करण्यात आली होती. या चर्चेदरम्यानच  राज्यपालांचे एक सही नसलेले पत्र व्हायरल झाले होते. या पत्रामध्ये राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. ३० तारखेला अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्याचे सांगितले होते. पण, पत्रावर राज्यपालांची सही नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस राजभवनाकडून ते फेक पत्र असल्याचे सांगितले होते. पण, आज सकाळीच राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात ३० जूनला बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली आहे. आधीच्या पत्रात सुद्धा हीच तारीख होती.मात्र, आजच्या पत्रात राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला काही सूचना केल्या आहेत. राज्यपालांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे -राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात आलेल्या बातम्या चिंताजनक आहेत. 39 आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे सविस्तर वृत्तांकन या माध्यमांनी केले आहे. -7 अपक्ष आमदारांचा ईमेल राजभवनाला 28 जून रोजी मिळाला आहे. या ईमेलमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहातील बहुमत गमावले असून लवकरात लवकर विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे -विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी 28 जून रोजी माझी भेट घेतली. त्यांनी मला राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बहुमत गमावल्याचा दावा त्यांनी केला आहे. -राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून सरकारला सभागृहाचा पाठिंबा आणि विश्वास आहे, याची खात्री करण्याचा मला अधिकार आहे.त्यामुळे मी 30 जून रोजी विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करावे असे निर्देश देतो. - 30 जून रोजी सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. या अधिवेशनात राज्य सरकारनं बहुमत सिद्ध करावे. विधानसभेचे कामकाज कोणत्याही परिस्थितीमध्ये गुरूवारी संध्याकाळी 5 वाजता समाप्त व्हावे. -काही नेत्यांची प्रक्षोभत वक्तव्य लक्षात घेता विधिमंडळाच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावी -विधिमंडळाच्या कामकाजाचे प्रक्षेपण लाईव्ह करण्यात यावे. त्यासंबंधीची सर्व तयारी करावी
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या