Home /News /mumbai /

'महाराष्ट्रात असता तर पोलिसांनी फरफटत आणलं असतं,' ठाकरे सरकारमधील मंत्र्याची बंडखोर आमदारांना धमकी

'महाराष्ट्रात असता तर पोलिसांनी फरफटत आणलं असतं,' ठाकरे सरकारमधील मंत्र्याची बंडखोर आमदारांना धमकी

शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांना (Shivsena MLA) लक्ष्य करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी या आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. त्याचवेळी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी बंडखोरांना उघड धमकी दिली आहे.

    मुंबई, 27 जून :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेची दोन गटामध्ये विभागणी झाली आहे. पक्षाचे बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. तर या गटावर कारवाई करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांना लक्ष्य करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी या आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यावरील संघर्ष सुरू असतानाच ठाकरे सरकारमधील मंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी बंडखोर आमदारांना उघड धमकी दिली आहे. उद्धव ठाकरेंसोबत सध्या शिवसेनेचे फक्त 3 मंत्री असून त्यामध्ये देसाईंचा समावेश आहे. गोरेगावमधील शिवसेना उत्तर भारतीय कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात देसाई बोलत होते. 'शिवसेना भवनात एक दरोडा पडला आहे.ते (बंडखोर) महाराष्ट्रातल्या कोणत्याही बिळात असते तर महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना फरफटत आणलं असतं. त्यामुळे ते घाबरून गुवाहाटीमध्ये बसले असून तिथून धमकी देत आहेत. सत्ताबदलाची स्वप्नं पाहात आहेत. ज्या दिवशी ते मुंबईत येतील त्या दिवशी निम्मे शिवसेना भवनात जातील आणि उर्वरित विमानळाच्या बाहेर जाऊ शकणार नाहीत. त्यांना विमानतळावरच घेराव घातला जाईल. शिवसेनेतील बंडखोर यापूर्वी पराभूत झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचीही तशीच अवस्था होईल, असा दावा देसाईंनी केला आहे. कोल्हापुरात राडा कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे आमदार आणि आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर  (Rajendra Patil-Yadravkar) यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली.शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसैनिकांनी राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चाची हाक दिली. मंत्रिमंडळ खातेवाटप: ठाकरे-शिंदे वादात शिवसेनेची पिछेहाट, राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढलं राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या कार्यालयाबाहेर दाखल जमा झाले होते. क्रांती चौकातून शिवसैनिकानी मोर्चाला सुरुवात झाली.  यड्रावकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयावर धडक दिली.यावेळी शिवसैनिकांनी यड्रावकर यांचा पुतळाही जाळला. तसंच कार्यालयाबाहेर असलेला बोर्डही तोडून टाकला.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra politics, Shivsena, Subhash desai

    पुढील बातम्या