Home /News /mumbai /

ठाकरे सरकार वाचवण्यासाठी पवारांची रणनीती,थेट शिंदेनाच 'आऊट' करण्याचा प्लॅन

ठाकरे सरकार वाचवण्यासाठी पवारांची रणनीती,थेट शिंदेनाच 'आऊट' करण्याचा प्लॅन

महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी या सरकारचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनी कंबर कसली आहे. विधानसभेच्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पवारांनी खास सूचना केल्या आहेत.

    मुंबई, 24 जून : महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी या सरकारचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनी कंबर कसली आहे. विधानसभेच्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पवारांनी खास सूचना केल्या आहेत. त्यानुसार थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आऊट करण्याचा पवारांचा प्लॅन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतील शिंदे समर्थक आमदार हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. पण, त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईमध्ये विधानसभेत यावे लागेल. त्यावेळी शिंदे यांना रोखण्याचा प्लॅन पवारांनी बनवल्याचं समजतंय. विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांच सभासदत्व रद्द झाल्यावर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी संख्याबळाचं गणित बदलणार आहे. या बदललेल्या गणिताचा फायदा ठाकरे सरकारला करून देण्याची पवारांची योजना आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं तर राजकीय चित्र बदलू शकतं, त्यामुळे त्यावर देखील आता महाविकास आघाडी सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात नाही शिंदे समर्थक आमदारांवर कारवाई एकनाथ शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधिमंडळ कायद्यांतर्गत झिरवळ कारवाई करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 12 आमदार कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. मात्र आता हा आकडा आणखी वाढला आहे.आता यात आणखी 5 आमदारांची भर पडली आहे. शिवसेनेकडून आणखी पाच जणांविरोधात अपात्रतेसाठी नावे देण्यात आली आहेत. सदा सरवणकर, संजय रायमुळकर, प्रकाश अबिटकर, बालाजी किणीकर, रमेश बोरनारे या आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.शिवसेना बंडखोरांवर कारवाई करत एकूण संख्याबळ कमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Eknath Shinde, NCP, Shiv sena, शरद पवार. sharad pawar

    पुढील बातम्या