मुंबई, 24 ऑक्टोबर : युवासेना अध्यक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. आदित्य ठाकरे यांना 70 हजार 191 मतांनी विजय झाला आहे. येथे आदित्य ठाकरे आणि आघाडीचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांच्यात प्रमुख लढत होती. तर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील वादग्रस्त स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनीही थेट आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. दरम्यान, सुरेश माने यांना 15296 मतं तर बिचुकले यांना 647 मतं मिळाली आहेत.
(वाचा : मंडळी! 1 लाख 63 हजार 176 ही फक्त एकूण मत नाहीत, तर लीड आहे लीड)
निवडणुकीदरम्यान मुंबईतील वरळी मतदारसंघाची प्रचंड चर्चा होती. कारण, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली. कारण 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे कुटुंबातील कोणताही सदस्य कधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नव्हता. यानिमित्तानं निवडणूक लढवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य ठरलेत. आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असल्याच्या घोषणेमुळे एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे आघाडी येथे आपला सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं जवळपास निश्चितच झालं होतं.
(वाचा : विजयानंतर धनंजय मुंडेंचे फक्त 'दोन शब्द', परळीत पंकजा मुंडेंना धक्का!)
Shiv Sena's Aditya Thackeray has won from Worli assembly constituency. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/pF8sjaVNdK
— ANI (@ANI) October 24, 2019
असा आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
1962 : माधव नारायण बीरजे (काँग्रेस)
1967 : माधव नारायण बीरजे (काँग्रेस)
1972 : शरद शंकर दीघे ( काँग्रेस)
1987 : प्रल्हाद कृष्णा कुरणे ( CPI)
1980 : शरद शंकर दीघे ( काँग्रेस)
1985 : विनिता दत्ता सामंत ( अपक्ष)
1990 ते 2004 : दत्ताजी नलावडे (शिवसेना)
मतदारसंघ पुनर्रचना
2009 : सचिन अहिर ( राष्ट्रवादी काँग्रेस)
2014 : सुनील शिंदे ( शिवसेना)
Maharashtra: Maharashtra Chief Minister & BJP leader Devendra Fadnavis at party office in Mumbai. As per official trends by the Election Commission, he is leading from Nagpur South West constituency. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/2W63bVey1P
— ANI (@ANI) October 24, 2019
(वाचा : कणकवलीत धक्का बसलेला असतानाही शिवसेनेनं कोकणचा गड राखला)
शिवसेनेने भाजपकडे मागितलं मुख्यमंत्रिपद, 50 -50 फॉर्म्युल्याची अट - सूत्रांची माहिती
दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये निम्मी मंत्रिपदं शिवसेनेला हवी आहेत. शिवसेनेने, अडीच - अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाची अट घातली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये निम्म्या कालावधीसाठी शिवसेना आणि निम्म्या कालावधीसाठी भाजपचा मुख्यमंत्री असेल, असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. विधानसभेच्या निकालांमध्ये भाजपला मागच्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळाल्या. याउलट शिवसेनेचं मात्र नुकसान झालं नाही, असं चित्र आहे. यामुळेच शिवसेनेने भाजपसमोर अटीशर्ती ठेवल्या आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आधी शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं नव्हतं. पण नंतर भाजपने शिवसेनेला सोबत घेतलं. शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा भाऊ कोण यावरून प्रत्येक निवडणुकीत स्पर्धा पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.
EXIT POLLनं आदित्य ठाकरेंबाबत काय दिला होता कौल?
News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असा अंदाज Exit Pollमध्ये वर्तवण्यात आला होता. तर Exit Poll नुसार वरळी मतदारसंघामध्येआदित्य ठाकरे बाजी मारणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. पहिल्यांदाच विधानसभेत उमेदवारी मिळवणारे आदित्य ठाकरे बाजी मारली आहे. खरंतर वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2014 च्या विधानसभा निवणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे वरळीचे आमदार झाले. त्याआधी 2009 मध्ये सचिन अहिर आमदार झाले होते.
वरळी विधानसभा निवडणूक 2014 निकाल
सुनील शिंदे, शिवसेना - 60 हजार 625 मते
सचिन अहीर, राष्ट्रवादी - 37 हजार 613 मते
LIVE VIDEO : नितेश यांच्या विजयावर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया