मुंबई, 24 ऑक्टोबर : मतदानाच्या दोन दिवस आधी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. त्याचा राज्यातील निवडणुकीच्या निकालावर परिणाम दिसून आला. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली अखेरची सभा आणि त्यानंतर परळीत मुंडे बंधू-भगिनींमधील वाद. पवारांच्या पावसातील सभेनं पश्चिम महाराष्ट्रातलं वारं बदललं तर परळीत धनंजय मुंडे यांना फायदा झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतली सर्वात चुरशीची लढत म्हणून परळी मतदार संघातील मुंडे भाऊ-बहिण यांच्याकडे पाहिले जात होते. काट्याची लढत होईल असे अपेक्षित असताना तिसऱ्या फेरीपासून धनंजय मुंडे यांनी निर्णायक आघाडी मिळवली आणि आपला विजय खेचून आणला. परळी हा पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला असतानाही या ठिकाणी धनंजय मुंडेनी खेचून आणलेल्या विजयाची सर्वत्र चर्चा होत आहे.
विजयानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत जनतेनं दिलेला कौल मान्य असून पराभव स्वीकारत असल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून फक्त दोनच शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनी सत्यमेव जयते असं म्हणत आपल्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली. वाचा : शिवसेनेने भाजपकडे मागितलं मुख्यमंत्रिपद,50-50 फॉर्म्युल्याची अट,सूत्रांची माहिती मतदानाच्या अगोदर परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर परळीध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात वातावरण तयार झाले होते. कथित व्हिडिओ क्लिपमधील वादग्रस्त वक्तव्याबाबत धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. त्याआधी पंकजा मुंडे यांना सभेवेळी भोवळ आली होती. त्यानंतर 20 तासांनी पंकजा मुंडे लोकांसमोर आल्या होत्या. त्यावेळी लोकांना भावनिक केलं जात असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. वाचा : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच ‘भाजप’ला धक्का, विदर्भानं बिघडवलं गणित! LIVE VIDEO : छगन भुजबळांनी भाजपला सुनावले, उदयनराजेंना फटकारले

)







