मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mucormycosis चा विळखा, उपचारासाठी ठाकरे सरकार खरेदी करणार 1 लाख इंजेक्शन, हाफकिनला दिली ऑर्डर

Mucormycosis चा विळखा, उपचारासाठी ठाकरे सरकार खरेदी करणार 1 लाख इंजेक्शन, हाफकिनला दिली ऑर्डर

 Mucormycosis treatment Amphotericin injection हे इंजेक्शन महागडं आहे. त्यामुळं त्याच्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचंही टोपे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सांगितलं.

Mucormycosis treatment Amphotericin injection हे इंजेक्शन महागडं आहे. त्यामुळं त्याच्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचंही टोपे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सांगितलं.

Mucormycosis treatment Amphotericin injection हे इंजेक्शन महागडं आहे. त्यामुळं त्याच्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचंही टोपे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सांगितलं.

मुंबई, 11 मे : कोरोनानंतर (Coronavirus)नंतर आता म्युकोरमायकोसिसचा (Mucormycosis)विळखा वाढत आहे. त्यामुळे या आजारासंदर्भात उपाययोजना करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. याच्या उपचारासाठी लागणाऱ्या अॅम्फोतेरसीन (Amphotericin) इंजेक्शनच्या 1 लाख डोसची ऑर्डर सरकारने दिल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

(वाचा-Salute! चिमुरड्यांसह आई-वडिलांनाही झाला संसर्ग, तरी डॉक्टर आई बजावतेय कर्तव्य)

म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) हा अत्यंत गंभीर आजार असून त्याचे शरिरावर होणारे परिणामही भयंकर आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या प्रकारच्या रुग्णांवर उपचार होणं गरजेचं आहे. त्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणार असल्याचा पुनरुच्चार टोपे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. त्याचबरोबर या आजारावरील उपचारासाठी लागणारे इंजेक्शन हे महागडे आहेत. ऐनवेळी रुग्णसंख्या वाढली तर त्याचा तुटवडा होऊ नये किंवा गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी अॅम्फोतेरसीन (Amphotericin)इंजेक्शनच्या 1 लाख डोसची ऑर्डर दिल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला याची ऑर्डर दिल्याचं राजेश टोपे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

(वाचा-रामराज्याची भाषा करणाऱ्या भाजपनं UP-बिहारला रामभरोसे सोडलं, नवाब मलिकांचा निशाणा)

यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी सोमवारी जालन्यात या आजाराचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (mahatma jyotiba phule jan arogya yojana)केल्याची घोषणा केली होती. त्यामुळं राज्यात 1000 रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस (Mucormycosis) यावर या योजनेंतर्गत उपचाराची सुविधा मिळेल असं टोपेंनी जाहीर केलं होते. म्युकोरमायकोसिसवर उपचारासाठी लागणारं अॅम्फोतेरसीन (Amphotericin) हे इंजेक्शन महागडं आहे. त्यामुळं त्याच्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचंही टोपे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सांगितलं.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

म्युकरमायकोसिस दुर्मिळ असला, तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती (Immunity) कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात (ICU) असलेल्या, तसंच अवयव प्रत्यारोपण (Transplantation) केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस होणं तसंच त्यामुळे त्यांचा मृत्यू होणं अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण कोविड-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे, असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. कोविड-19 मधून चांगल्या पद्धतीनं बरं होत असलेल्या पेशंट्सना याची लागण होण्यामध्ये अचानक वेगाने वाढ होणं ही काळजीची बाब असल्याचं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Rajesh tope, Uddhav tahckeray