रामराज्याची भाषा करणाऱ्या भाजपनं UP-बिहारला रामभरोसे सोडलं, नवाब मलिकांचा निशाणा

रामराज्याची भाषा करणाऱ्या भाजपनं UP-बिहारला रामभरोसे सोडलं, नवाब मलिकांचा निशाणा

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काही प्रेतं नदीत वाहून (Dead body found in river) आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यावरून नवाब मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 11 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची (Corona cases) संख्या झपाट्यानं वाढत आहे. तर कोरोना मुळे मृत्यू (Corona patient death) होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. अशातचं सरकार मृतांचे आकडे लपवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि दुसरीकडे वैद्यकीय सुविधांचा प्रचंड अभाव यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होतं. अशातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काही प्रेतं नदीत वाहून (Dead body found in river) आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

या प्रकारानंतर आता देशातील वातावरण पेटताना दिसत आहे. विरोधी पक्षांसोबत सामाजिक कार्यकर्तेही सरकारच्या गलथान कारभारावर बोट ठेवत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपानं रामराज्याची भाषा केली होती. परंतु दोन्ही राज्यांना भाजप सरकारनं रामभरोसे सोडलं आहे, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं आहे.

हे वाचा-कोरोनातून बचावल्यानंतर हा आजार घेतोय जीव; राज्य सरकारने पहिल्यांदाच दिली कबुली

खरंतर, काल उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये नदीत काही प्रेतं टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत काही प्रेतं आढळली, तर गंगा नदीत 40 हून अधिक प्रेतं दिसली आहेत. यावरून या राज्यांत कोरोना स्थिती किती भयंकर आहे, हे चित्र स्पष्ट होतं आहे. बिहारमध्ये तर कोरोना चाचण्याही होतं नाहीत, आणि तिथे डॉक्टरही नाहीत. लोकं दिवसा डोळे उघडतात आणि सायंकाळी मरतात, अशी स्थिती याठिकाणी निर्माण झाली असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

हे वाचा- भयंकर! गंगेत वाहताना आढळले 40-45 मृतदेह; कोरोना बळींची विल्हेवाट लावल्याचा संशय

एवढंच कशाला प्रेतं जाळण्यासाठी याठिकाणी लाकडंही नाहीत. म्हणूनच नातेवाईक कोरोना रुग्णांची प्रेतं अशाप्रकारे नदीत टाकून देत आहेत. ही सत्य परिस्थिती आहे असंही नवाब मलिक यावेळी म्हणाले. एकीकडे उत्तर प्रदेशात कोरोना स्थिती भयावह बनत चालली आहे. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ जाहिरातबाजी करून सत्यापासून दूर पळत आहेत, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Published by: News18 Desk
First published: May 11, 2021, 3:53 PM IST

ताज्या बातम्या