पाटणा, 11 मे: कोरोनामुळे दररोज 4 लाख लोकांना संसर्ग होतो आहे. देशात कोरोना स्थिती (Corona crisis) इतकी वाईट आहे की, रुग्णांना हॉस्पिटल (Hospital) मध्ये बेड मिळत नाही. तो मिळाला तर ऑक्सिजन (Oxygen) मिळत नाही. हवी ती औषधं मिळवण्यासाठी नातेवाईकांची वणवण होते आणि अखेर काहीतरी कुठेतरी चुकतं, हिंमत हरतात आणि कोरोनामुळे मृत्यू होतो. देशात कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना पेशंटला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचं प्रयत्न करत आहेत. पण त्यांनाही सतत 24 तास संसर्गाचा धोका असतो. अशाच एका डॉक्टर महिलेला (corona warrior) कोरोना संसर्ग झाला. तिच्या दोन लहान मुलांचा आणि आई-वडिलांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. पण हिंमत न हरता या डॉक्टर महिलेने फोनवर कन्सल्टिंगचं काम अखंड सुरू ठेवलं आहे. कोरोनातून बरी होणार आणि पुन्हा रुग्णसेवेला जाणार, ही हिंमत डॉ. सोनल सिंह बोलून दाखवतात, तेव्हा त्यांना कडक सॅल्युट करावा वाटतो.
सोनल यांच्यासारखे हजारो फ्रंट लाइन वर्कर स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. त्यांना देखील कोरोना संक्रमण होत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना मृत्यू झालेल्या डॉक्टरांची संख्यांही जास्त आहे. पण, तरी देखील डॉक्टर आपलं कर्तव्य बजावत आहेत. बिहारमध्ये पाटण्यात (Patana) राहणाऱ्या आय सर्जन (Eye Surgeon) डॉ. सोनल सिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 व्यक्तींनाही कोरोनाची लागण झालेली आहे.
('आज मला शांत झोप लागेल', कोरोनामुक्त प्रिया बापटने पहिल्यांदाच केलं मोठं काम)
डॉ. सोनल यांचे आईवडील त्यांची दोन मुलं यांनाही कोरनाची लागण झालेली आहे. डॉक्टर सोनल यांचा 4 वर्षांचा मुलगा अक्षत आणि एक वर्षाचा मुलगा अद्वैत हे दोघेही कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यांच्या पतीचा रिपोर्ट निगेटीव्ह (Negative Report) आल्याने त्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे.
(साधं कृमीनाशक औषध Ivermectin संपवू शकतं कोरोनाची महासाथ; शास्त्रज्ञांचा दावा)
मात्र डॉक्टर सोनल यांनी हिंमत सोडलेली नाही. त्या स्वत: कोरोना पॉजिटीव्ह (Corona Positive) असूनही आपल्या रूग्णांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काळजी घेत आहेत. त्या रुग्णालयात नसल्या तरी, प्रत्येक रूग्णाची फोनवरून माहिती घेत आहेत. शिवाय हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णांसाठी मॅनेजमेंट (Management)ची जबाबदारीही त्या सांभाळत आहेत. दैनिक भास्करने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
पटना शहरात राहणाऱ्या डॉ. सोनल सिंह (Dr. Sonal Singh)नेत्र सर्जन आहेत. नेत्र तपासणी करताना रूग्णांबरोबर अगदी जवळून करावी लागते त्यामुळे त्यांना 15 दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर त्यांच्या कुटूंबातल्या माणसांनाही कोरोना झाला. त्यांचे पती डॉ. अखिलेश यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असला तरी, दोन्ही मुलं आणि आईवडील पॉजिटीव्ह असल्याने त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी डॉ. सोनल यांच्यावर आली आहे. मुलं अगदी लहान असल्याने त्यांच्या जेवणापासून औषधापर्यंत सगळीकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं.
('कोरोना पसरवणारे' तबलिगी आता करत आहेत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार)
पण, तरीही त्या घरामधून रुग्णालायाची जबाबदारीही पेलत आहे. फोनवरून सगळ्यांच्या संपर्कात राहण्याचा त्या प्रयत्न करतात. प्रत्येक केसचं अपडेट घेत राहतात. शिवाय रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही हेही पाहतात.
मुलं आणि आईवडील लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांची काळजी घेतांना घरातलं वातावरण पूर्णपणे पॉझिटिव्ह ठेवण्याचा त्या प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुलांमध्ये फरक दिसत आहे. मुलं आता हळूहळू रिकव्हर होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Coronavirus, Positive story