Home /News /money /

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, पाहा काय आहे लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, पाहा काय आहे लेटेस्ट गोल्ड रेट

दिल्ली सराफा बाजारात आज 12 एप्रिल 2021 रोजी (Gold Price Today) 10 ग्रॅमसाठीचा सोन्याचा भाव 46000 रुपयांवर पोहचला आहे. चांदीचा दरही (Silver Price Today) आज कमी झाला आहे.

    नवी दिल्ली, 12 एप्रिल : भारतीय बाजारात सोने दरात काहीशी घसरण झाली आहे. त्यामुळे दिल्ली सराफा बाजारात आज 12 एप्रिल 2021 रोजी (Gold Price Today) 10 ग्रॅमसाठीचा सोन्याचा भाव 46000 रुपयांवर पोहचला आहे. चांदीचा दरही (Silver Price Today) आज कमी झाला आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 46,127 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर चांदीचा दर 66,313 रुपये प्रति किलोग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Markets) आज गोल्ड रेट घसरला, तर चांदीच्या दरात खास बदल झाले नाहीत. सोन्याचा आजचा नवा दर (Gold Price, 12 April 2021) - दिल्ली सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याचा दर 57 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा आजचा भाव 46,070 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात एक तोळा सोनं 46,127 रुपये इतकं होतं.

    (वाचा - रविवारी RTGS सेवा 14 तासांसाठी बंद राहणार; RBI ने सांगितलं कारण)

    चांदीचा आजचा भाव (Silver Price, 12 April 2021) - चांदीच्या दरात आजही घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 270 रुपयांनी घसरला. त्यामुळे आज चांदीचा दर 66,043 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. याआधीच्या सत्रात चांदीचा दर 66,313 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

    (वाचा - एक चूक आणि रिकामं होईल FD अकाउंट; ग्राहकांना अलर्ट)

    सोने दरात घसरण का? एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क स्थित कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव घसरल्यामुळे, भारतीय बाजारातही सोन्याच्या किंमती कमी झाल्या. दुसरीकडे, देशात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने लोक पुन्हा एकदा गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे वळले आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतींना समर्थन मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या