Home /News /maharashtra /

बेडसाठी शहरभर फिरले अन् रुग्णालयाच्या दारातच गाडीमध्ये सोडला जीव, अहमदनगरमधील मन हेलावून टाकणारी घटना

बेडसाठी शहरभर फिरले अन् रुग्णालयाच्या दारातच गाडीमध्ये सोडला जीव, अहमदनगरमधील मन हेलावून टाकणारी घटना

कुठेही बेड शिल्लक नव्हता. गायकवाड यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, रुग्णालयाच्या परिसरात पोहोचल्यानंतर गाडीतच त्यांचा मृत्यू झाला.

अहमदनगर, 12 एप्रिल :  अहमदनगरच्या (ahmednagar) जिल्ह्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज जिल्ह्यात रुग्णालयातील (district hospital) आणखी एक वेदनादयी प्रकार समोर आला आहे. श्रीरामपूरहुन उपचारासाठी आलेल्या एका वृद्ध रुग्णाला शहरात कुठेच बेड न मिळाल्यामुळे रुग्णालयाच्या दारातच गाडीमध्येच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार,  श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथील विक्रम अण्णा गायकवाड यांना श्वसनाचा त्रास होत होता.  अत्यवस्थ असताना त्यांनी ड्रायव्हर सोबत अहमदनगर शहर गाठले. सुरुवातीला जिल्हा रूग्णालयात बेड उपलब्ध आहे का याची चौकशी केली असता एकही बेड शिल्लक नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पुढचे दोन तास शहरातील खाजगी रूग्णालयात बेड मिळतोय का? यासाठी प्रयत्न केला मात्र कुठेही त्यांना जागा मिळाली नाही. अखेर पुन्हा ते माघारी जिल्हा रूग्णालयात आले. पण तोपर्यंत बराच उशिर झाला होता. विक्रम गायकवाड यांची गाडीतच दुर्दैवी मृत्यू झाला. एक चूक आणि रिकामं होईल FD अकाउंट; ग्राहकांना अलर्ट एकीकडे गायकवाड रुग्णालयात बेड कुठे मिळतोय का, याचा शोध घेत होते तर दुसरीकडे त्यांच्या नातेवाईकांनीही शहरातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये विचारणा केली होती. मात्र, कुठेही बेड शिल्लक नव्हता. गायकवाड यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, रुग्णालयाच्या परिसरात पोहोचल्यानंतर गाडीतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती मृतांच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पण, यासाठी बराच वेळ लागला. तब्बल 2 तास गायकवाड यांचा मृतदेह हा गाडीतच होता. मजुराची 11 हजार पुस्तकांची लायब्ररी जळून खाक; सोशल मीडियामुळे मिळाली मदत याबाबत शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांना विचारले असता 'या प्रकरणाची मला माहिती नाही मात्र या दोन दिवसापासून अहमदनगर जिल्हा रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील रूग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने अनेकांना वनवन भटकावं लागतंय.. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत चालली असून उपचाराची वाणवा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात मृतांचा आकडा वाढत चालला आहे. एकाचवेळी चाळीसपेक्षा जास्त जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता तरी जिल्हा प्रशासनाने आरोग्य सुविधेकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ahmednagar, अहमदनगर

पुढील बातम्या