• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मोठी बातमी ! काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मोठी बातमी ! काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

नाना पटोले, बाळासाहेब थोरातांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

नाना पटोले, बाळासाहेब थोरातांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Maharashtra political developments: राज्यातील काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर : महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली (Maharashtra Congress leaders meet Devendra Fadnavis). देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती काँग्रेस नेत्यांनी केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांच्या निधानाने रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून संजय उपाध्याय यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या निधनानंतर त्याच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत सहसा विरोधी पक्ष आपला उमेदवार देत नाही. त्यामुळेच यावेळी सुद्धा भाजपने आपला उमेदवार मागे घेत राज्यसभेची पोटनिवडणूक बनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही भेट नेमकी कुठल्या मुद्द्यावर होत आहे याबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच इतरही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा एका गाडीतून प्रवास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसून आले. 18 सप्टेंबर रोजी नंदूरबार येथील एका कार्यक्रमात दोन्ही नेते कार्यक्रमस्थळी एकाच गाडीतून पोहोचले.
  Published by:Sunil Desale
  First published: