Home /News /mumbai /

मुख्यमंत्री निवडणूक लढविणार का? उद्धव ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा

मुख्यमंत्री निवडणूक लढविणार का? उद्धव ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा

'मी काय धर्मांतर केलंय? आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रह्मवाक्य आहे की काय?'

  मुंबई 03 फेब्रुवारी : मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिले. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले तर मुख्यमंत्र्यांनी ठाकरे पद्धतीने त्याची उत्तर दिलं. या आधी संजय राऊत हे बाळासाहेबांचीही अशीच रोखठोक मुलाखत घेत असतं. राज्यातलं महाआघाडीचं सरकार येवून आता काही महिने होत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तीन पक्षांचं सरकार असल्याने वादही होत आहेत. हिंदुत्व शिवसेनेनं सोडलं असेही आरोप होताहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रश्नांना उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबरला राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्याला आता दोन महिने पूर्ण होत आहेत त्यामुळे ठाकरे हे कुठून निवडणूक लढविणार असा आता प्रश्न विचारला जातोय. त्याचा खुलासा उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत केला. आमदार म्हणून निवडून न येता मुख्यमंत्री किंवा कुठलंही मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडून येणं गरजेचं असतं. विधानसभा किंवा विधान परिषदेमधून त्यांना निवडून यावं लागतं. त्यामुळे मुख्यमंत्री थेट लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवितात की विधान परिषदेवर जातात याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.

  'होय, आम्ही हिरोईन आहोतच पण...', रुपाली चाकणकरांचं भाजप नेत्याला उत्तर

  काय म्हणाले उद्धव ठाकरे... परिषद की सभा? तुम्हाला सांगू का! मुळात मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की, एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्न नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून. मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन. ताबडतोबीने आता मला वाटतं विधान परिषदा येतील. विधानसभेवर जायचं म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून परत निवडणुका घेऊन. विधान परिषदेपेक्षा माझे मत असे आहे की, ही जबाबदारी आली ती पार पाडण्यासाठी जर विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलो आहे.

  गावातला अस्सल रँचो, शेतकऱ्याच्या मुलाने बनवली Electric सायकल

  हिंदुत्व सोडलं का? मी काय धर्मांतर केलंय? आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रह्मवाक्य आहे की काय? की घटनेत लिहिलंय की, हे म्हणतील तेच हिंदुत्व. आपण म्हणजे सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा आव कुणी आणू नये. आपण म्हणतो तेच खरं आणि बाकीचे म्हणतील ते झूठ हा हास्यास्पद दावा आहे. त्यांच्यापुरता हा दावा त्यांनी त्यांच्या कार्यालयात करायला हरकत नाही.यात दोन भिन्न विचारधारा, तीन भिन्न विचारधारा तुम्ही म्हणताय; पण केंद्रात जे सरकार आहे त्यात आता किती पक्ष आहेत? त्यांचे किती विचार आहेत? नितीशकुमार आणि भाजपची विचारधारा एक आहे का? मेहबुबा मुफ्ती आणि त्यांची विचारधारा एक होती का? चंद्राबाबूंची एक होती का? ममता बॅनर्जी त्यावेळी सत्तेत होत्या त्यांची विचारधारा एक होती का? जॉर्ज फर्नांडिस यांची विचारधारा एक होती का? रामविलास पासवान आज त्यांच्यासोबत आहेत. त्यांची आणि भाजपची विचारधारा एक आहे का? आता झारखंडमध्ये काय घडलं? तिथं विचारधारा जुळली का? सगळं कसं आहे, झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणायचं. आपण घरात गंगाजल आणून ठेवतो तसंच.

  ‘हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर’, आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका

  राज्याचं हित महत्त्वाचं एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या विचारधारा आहेत ना. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारच. काँगेसची विचारधारा वेगळी आहे, पण दोन्ही, तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत त्यांचे उदाहरण घ्या. आपापल्या राज्याचं हित, देशाचं हित या विचारापेक्षा कोणी भिन्न आहे का? आम्हाला राज्याचं हित करायचं नाहीय का? देशाचं हित करायचं नाही का? देशात, राज्यात अराजक माजवायचंय का? आणि तरीही आम्ही तुमच्यासोबत येतोय असं म्हणून कोणी एकत्र आलेले नाहीय. कश्मीरमध्ये जी विचारधारेची गफलत झाली होती तशी इकडे झालीय का? सत्ता नवीन नाही मी प्रामाणिकपणे सांगतो की, सत्तेची खुर्ची ही माझ्यासाठी नवीन असली तरी सत्ता माझ्यासाठी नवीन नाही. शिवसेनाप्रमुखांनी जी सत्ता किंवा हुकुमत गाजवली ती मी जवळून बघितली आहे. मुख्य म्हणजे, त्यांनी ती जनकल्याणासाठी राबवली. त्यामुळे मला हे नवीन नाही. चीनमध्ये राहणे भीतीदायक, कोरोना व्हायरसनंतर आता बर्ड फ्लूचा धोका महाराष्ट्राचा मंगल कलश तो मंगल कलश पाहिल्यावर वाटलं, आजही संयुक्त महाराष्ट्राचं काम थोडं अपुरं आहे ही भावना नेहमी माझ्या मनात असते ती प्रकर्षाने त्या दिवशीही मनात आली. त्या मंगल कलशाबरोबरच माझे आजोबा मला सांगत त्या संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या आठवणी, माझ्या वडिलांकडून ऐकलेल्या त्या समर प्रसंगाच्या आठवणी उचंबळून आल्या. मंत्रालयात जाण्याआधी मी हुतात्मा स्मारकात गेलो होतो. त्या वेळी त्या हुतात्म्यांना वंदन करून मी हेच सांगितलं होतं की, तुम्ही जे रक्त सांडलंय या महाराष्ट्रासाठी हे रक्त मी कदापि वाया जाऊ देणार नाही. तुमची अपेक्षा पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Uddhav thackeray

  पुढील बातम्या