हरीष दिमोटे, शिर्डी 02 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्यातील एका कॉलेज तरूणाने इलेक्ट्रीक सायकल बनवलीय. ग्रामीण भागातील तरूणांच्या पैशाची बचत व्हावी आणि शाळा कॉलेजला जाण्या येण्यासाठी होणाऱ्या खर्चात बचत व्हावी यासाठी त्याने बनवलेली ही सायकल नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. गावातल्या या अस्सल रँचोचं सगळ्यांनीच कौतुक केलंय. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं शहरी मुलांपेक्षा कमी आहेत असं काहींना वाटतं. मात्र शिर्डीजवळच्या शेतकऱ्याच्या मुलाने चक्क इलेक्ट्रीक सायकल बनवलीय. प्रवरा इंजिनिअरींग कॉलेजला दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या वैभव गाडेकर याने ही कमाल केलीय. वैभव हा राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक इथं राहतो.
दररोज पंधरा किमी प्रवास करून लोणी प्रवरानगर येथे कॉलेजला शिक्षणासाठी त्याला जावं लागतं. दररोज जाण्या येण्याचा खर्च कमी करावा यासाठी त्याने अफलातून शक्कल लढवलीय. चक्क त्याने आपल्या सायकललाच ई बाईक बनवलंय. चार्जिंगची बॅटरी, मोटर यांच्या सहाय्याने त्याने सायकलचं पॅडल न मारता चालवण्याचा प्रयोग यशस्वी केलाय.
त्याची ही अभिनव सायकल साधारण पन्नासच्या वेगाने धावू शकते. एकाचवेळी तुम्ही सेल्फ रनिंग आणि पॅडलचाही उपयोग करू शकता. अगदी मोटरसायकलच्या बरोबरीने ती रस्त्ययावरून लावत असल्याने वैभवचा प्रयोग यशस्वी ठरलाय. वैभव आता दररोज आपल्या सायकलवरून काहीही पैसे खर्च न करता कॉलेजला जा ये करत आहे.
हातपाय दाबून थकलो, आता गळा दाबायची वेळ, पाणी प्रश्नावर विद्यार्थी आक्रमक
ग्रामीण भागातील मुलांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकदा शाळा कॉलेजला जाता येत नाही किंवा साधनं उपलब्ध नसल्यानेही शिक्षण सोडावं लागतं अशांसाठी ही सायकल नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असलेल्या वैभवने ही सायकल बनवली आणी आता सेल्फ चार्जिंगची सुविधा देखील तो लवकरच बनवणार असून पुढे तयार झालेली ही परिपूर्ण ई सायकल इतरांना बनवून देण्याचा त्याचा मानस आहे.
भर चौकात तरुणाची धार धार शस्त्राने वार करून हत्या
खरं तर अशावेळी अनेकदा घरचे साथ देत नाहीत मात्र वैभवचे काका विलास गाडेकर यांना विश्वास होता की हा नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखवेल यामुळे ते त्याच्या पाठीशी उभे राहीले आणी त्याला सर्व मदत केलीय.
वैभवची आई सुनिता गाडेकर यांनाही आपल्या मुलाने जगावेगळं काहीतरी केल्याचा हेवा वाटतोय. जिद्द आणी धडपड करण्याची तयारी असेल तर नक्कीच आपण अडचणींवर मात करू शकतो हे वैभवने दाखवून दिलेय. जर या प्रयोगाला आणखी पाठबळ मिळाले तर राज्यातील इतर सामान्य मुलांपर्यत ही सायकल पोहचण्यास नक्कीच मदत होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.