मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai Coastal Road: मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडचे बांधकाम संथ गतीने, कंत्राटदाराला ठोठावला दंड

Mumbai Coastal Road: मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडचे बांधकाम संथ गतीने, कंत्राटदाराला ठोठावला दंड

Mumbai Coastal Road project work delayed: मुंबईतील कोस्ट लोडचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या संदर्भात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत माहिती दिली आहे की, संबंधित कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात येत आहे.

Mumbai Coastal Road project work delayed: मुंबईतील कोस्ट लोडचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या संदर्भात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत माहिती दिली आहे की, संबंधित कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात येत आहे.

Mumbai Coastal Road project work delayed: मुंबईतील कोस्ट लोडचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या संदर्भात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत माहिती दिली आहे की, संबंधित कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात येत आहे.

मुंबई, 28 डिसेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचे (Mumbai Coastal Road) बांधकाम संथ गतीने सुरू असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत दिली. मुंबईतील कोस्टल रोड हा प्रकल्प मध्य मुंबईतील वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर याचे काम सुरू करण्यात आले मात्र, आता हे बांधकाम संथगतीने सुरू असल्याचं समोर आलं आहे. बांधकाम संथगतीने सुरू असल्याने आता हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत लेखी उत्तरात माहिती देताना सांगितले की, मुंबई कोस्टल रोडचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. कोस्टल रोडवरील वर्सोवा - वांद्रे सागरी सेतूचे केवळ 2.077 टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात 5 टक्के बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. काम संथ गतीने सुरू असल्याने कंत्राटदारास प्रकल्प किमतीच्या 0.05 टक्के प्रति दिन दंड आकारला जातोय.

वाचा : शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा

का होतेय काम संथगतीने ?

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या बांधकामासाठी तब्बल 6 महिने उशिरा ड्रीलिंग सुरू करण्यात आलं. ठेकेदाराला आतापर्यंत फक्त 3 वेळा फक्त सूचनापत्र देण्यात आलं. या सुचनापत्रात दंड आकारणीचा उल्लेख नक्कीच आहे. मात्र, यावर ठेकेदारानं अनेक कारणं लिहून उत्तर सादर केलं आहे.

2022 वर्षअखेरीपर्यंतची डेडलाईन

बहुचर्चित मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं काम जोरदार सुरू आहे, हे सांगणारा एक VIDEO मुंबई महानगरपालिकेने गेल्यावर्षी शेअर केला होता. मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टचा दक्षिणेकडच्या भागाची झलक दाखवणारा हा व्हिडीओ होता. बृहन्मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोस्टल रोड साठी 2000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 2022 वर्षअखेरीपर्यंत या कोस्टल रोड वरळी ते मरीन ड्राइव्ह हा रस्ता खुला करण्याची डेडलाईन ठेवण्यात आली आहे.

या कोस्टल रोडचा दक्षिणेकडचा भाग मरीन लाइन्स भागातल्या प्रिन्सेस स्ट्रीटपासून सुरू होईल आणि बांद्रा वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकावर संपेल. 10 किलोमीटरचा हा रस्ता 4 लेन्सचा असणार आहे. त्यातली एक लेन BRT आणि रुग्णवाहिकेसाठी असेल. या रस्त्यालगत 1800 गाड्यांची सोय होईल असे प्रशस्त पार्किंग लॉटही उभारण्यात येणार आहेत. चार ठिकाणी पार्किंगच्या जागा असतील.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde, Mumbai, Uddhav thackeray