नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यात त्यांनी पहिल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार, ओबीसी आरक्षण, सुप्रीम कोर्टात सुरू असलेली लढाई या सर्व विषयांवर उत्तरं दिली. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे 1) राज्यात एका विचारातून या सगळ्या घडामोड झाल्या आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या सदिच्छा भेटी होत्या. हा राजकिय दौरा नाही. लोकांच्या मनात होतं तसं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही कालपासून आलो आहोत. लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी हे सरकार आहे. 2) या सरकार स्थापनेत फडणवीसांचं मोठं योगदान आहे. नड्डा साहेबही संपर्कात होते. सेना भाजपने युतीत निवडणूक लढवली. त्यामुळे हे लोकांच्या मनातील सरकार आहे. 3) राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीचा देखील आवश्यक आहे. पंतप्रधान नरेद्र मोदींचं महाराष्ट्रासंबंधीचं व्हीजन समजून घेणार आहोत. केंद्राची मदत मिळाल्यानंतर राज्य वेगाने प्रगती करते. 4) आषाढी एकादशीनंतर मुंबईत खातेवाटपावर चर्चा करणार. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल 5) 50 खोके कसले मिठाईचे का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला. ‘ही गद्दारी नाही तर क्रांती; आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं…’; बंडखोरीबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान 6) आम्ही गद्दारी केली नाही, तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं की अन्याय सहन करायचा नाही. ही गद्दारी नाही तर क्रांती आहे. 7) सभागृहात तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात होतो. सभागृहात सावरकारांबाबत बोलू दिले जात नव्हते. 8) अडीच वर्षापूर्वी जे सरकार स्थापन झालं होतं ते आता झालं. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही काहीही चुकीचं केलं नाही. आम्हीच शिवसेना आहोत हे लवकरच सिद्ध होईल. 9) ओबीसी आरक्षणाविना निवडणुका नको ही आमची भूमिका आहे. पावसळ्यात नगरपंचायतीच्या निवडणुका नको याबबत आयोगाशी चर्चा करणार. 10) महाराष्ट्राचे तुकडे व्हावे अशी कोणतीही चर्चा झाली नाही. काही जणांकडून दिशाभूल केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.