मुंबई, 1 जूलै : महाराष्ट्राच्या राजकारणात गुरूवारचा दिवस वेगवान घडामोडींचा ठरला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दर तासाला वेगानं बदलणाऱ्या या राजकीय घडामोडींचं सर्वात अचूक आणि वेगवान कव्हरेज News18 लोकमत वाहिनी आणि https://lokmat.news18.com/ यांनी केलं. या कव्हरेजला प्रेक्षक आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळालाच पण, त्याचबरोबर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरामध्येही News18 लोकमता पसंती मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या ठाण्यातील घरी सर्वांनी ‘News18 लोकमत’वर शपथविधी कार्यक्रम पाहिला. शिंदे यांच्या घरी गुरूवारी आनंदाचं वातावरण होते. गेल्या काही दिवसांच्या अनिश्चिततेनंतर त्यांना एक मोठी आनंदाची बातमी गुरूवारी मिळाली. शिंदे कुटुंबीयांनी त्यांच्या आनंदाचा हा सर्वोच्च क्षण ‘News18 लोकमत’वर पाहिला. News18 लोकमतनं या सर्व राजकीय घडामोडींचे वेगवान, अचूक आणि सखोल असे विश्लेषण केले. त्याला शिंदे कुटुंबीयांनीही दाद दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी News18Lokmat वर शपथविधी सोहळा पाहिला pic.twitter.com/YKnhiFbEzt
— News18Lokmat (@News18lokmat) July 1, 2022
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरूवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Aanand Dighe) यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रात्री उशिरा गोव्यात जंगी स्वागत; आमदारांच्या जल्लोषाचा नवा VIDEO एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होण्यास इच्छूक नव्हते. पण भाजपच्या वरिष्ठांनी आग्रह केल्याने त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली.