मुंबई, 12 सप्टेंबर: मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी शनिवारी तात्काळ मुंबई पोलिसांची (Mumbai Police) एक महत्त्वाची बैठक (Meeting) बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावं. तसंच जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray has called an urgent meeting of all senior Police officers in Mumbai: Chief Minister's Office (CMO)
— ANI (@ANI) September 11, 2021
(File photo) pic.twitter.com/0gHRlKpVuk
मुंबईची सुरक्षित शहर अशी देशात आणि जगभरात प्रतिमा असून ती डागाळू नये यासाठी सतर्क राहावं. तसंच महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना कराव्यात, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले असून उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केलं आहे. या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे उपस्थित होते. PHOTO: सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले शरद पवार मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सूचना दिल्या की, महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी. तसंच महिलांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवू शकतो अशी शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून याठिकाणी गस्त वाढवण्यात यावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणी देखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी, असंही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं आहे. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना पोहोचली थेट उत्तर प्रदेशामध्ये, लढवणार निवडणूक महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे. गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्वाची भूमिका असते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्वाच्या ठिकाणी बसविण्याची कार्यवाही लगेच सुरु करावी, अशा महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

)







