Home /News /mumbai /

राज्यासाठी लवकरच लॉकडाउन 3 चा निर्णय, इतके दिवस वाढण्याची शक्यता

राज्यासाठी लवकरच लॉकडाउन 3 चा निर्णय, इतके दिवस वाढण्याची शक्यता

लॉकडाउन आणि पुढील उपयायोजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली.

    अभिषेक पांडे, प्रतिनिधी मुंबई, 27 एप्रिल : कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. लॉकडाउन आणि पुढील उपयायोजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही राजधानी मुंबई आणि पुण्यात आढळून आली आहे. त्यामुळे राज्यात जर लॉकडाउन वाढवायचा असेल तर तो  मुंबई आणि पुण्यात कायम राहण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील इतर जिल्हे जे रेड झोनमध्ये आहे, त्यांचाही समावेश लॉकडाउन 3 मध्ये असणार आहे. हेही वाचा - '...तर पुन्हा कोरोनाचा प्रसार होणार', वैज्ञानिकांनी चीनला दिला इशारा मिळालेल्या माहितीनुसार, साधारणपणे तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाउन हा आणखी दोन आठवड्यांसाठी असण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने मुंबई आणि पुणे शहरावर जास्त भर असणार आहे. त्या व्यतिरिक्त जे झोन राज्यामध्ये तयार करण्यात आले आहे. त्या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तर, ज्या भागामुळे हॉटस्पॉट आहेत त्याठिकाणी ताळेबंद उठवला जाऊ नये , पण ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होत आहे तसंच हॉटस्पॉट कमी झाले तिथे 3मे नंतर दिलासा द्यायला हवा ,असं मत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, देशातील अनेक राज्यांना 3 मे पर्यंत असलेल्या लॉकडाउनचा कालावधी आगामी काही दिवसांसाठी अजून वाढवण्यात यावा असं वाटत आहे. तेलंगणा या राज्यात यापूर्वीच काही दिवस लॉकडाउन वाढवले आहे. दिल्ली , महाराष्ट्र ,मध्य प्रदेश,पश्चिम बंगाल , पंजाब आणि ओडिसा या राज्यांनी लॉकडाउन वाढविण्याचे संकेत दिले आहे. दिल्लीत लॉकडाऊन आगामी 16 मे पर्यंत वाढवायचे आहे, असे दिल्ली सरकारचे म्हणणे असल्याची माहिती आहे. यानंतर एक दिवसानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिशा या पाच राज्यांनी 3 मेनंतर आपापल्या राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. हॉटस्पॉट भागात कोणतीही सवलत मिळणार नाही. हेही वाचा - POSITIVE NEWS : लस...ड्रोन आणि रोबो, तंत्रज्ञानाच्या पातळीवर भारतात प्रयत्न याशिवाय गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक ही इतर सहा राज्ये केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करतील असे म्हणत आहेत . दुसरीकडे, आसाम, केरळ आणि बिहार यांचे म्हणणे आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीनंतर हा निर्णय घेतील. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या