Home /News /national /

POSITIVE NEWS : लस...ड्रोन आणि रोबो, तंत्रज्ञानाच्या पातळीवर संपूर्ण भारतात सुरू आहेत प्रयत्न

POSITIVE NEWS : लस...ड्रोन आणि रोबो, तंत्रज्ञानाच्या पातळीवर संपूर्ण भारतात सुरू आहेत प्रयत्न

(संग्रहित फोटो)

(संग्रहित फोटो)

कोरोना विषाणूविरोधी लढा देशातील प्रत्येक घटक आपापल्या परीने लढतो आहे.

नवी दिल्ली, 27 एप्रिल : जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतातीलही अनेक राज्यांमध्ये शिरकाव केला आहे. मात्र युरोपातील देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती अजूनही नियंत्रणात आहे. कोरोना विषाणूविरोधी लढा देशातील प्रत्येक घटक आपापल्या परीने लढतो आहे. मात्र, या लढ्यात सगळीकडेच तंत्रज्ञानाची मोठी मदत मिळत असल्याच दिसत आहे. कोरोनासाठी परवडणाऱ्या चाचणी किटपासून, ते विलगीकरण कक्षामध्ये असलेल्या रुग्णांना अन्न पुरविण्यासाठी वापरले जाणारे रोबो, मोठ्या प्रमाणावरील किराणा माल निर्जंतुक करण्यासाठी 'ड्रोन'च्या माध्यमातून सुरू असलेली औषध फवारणी अशी अनेक उदाहरणे यासाठी देता येतील. देशातील वीसपेक्षा जास्त प्रयोगशाळा आणि संस्था करोनाची लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाने भारताला धडक दिल्यानंतर या व्हायरसचा नाश करण्यासाठी सामान्य लोकही आघाडीवर असल्याचं दिसत आहे. त्यामुळे देशावरील हे संकट दूर करण्यासाठी प्रत्येकजणच या युद्धात उतरल्याचं दिसत आहे. आयआयटीनेही करोनाविरोधी लढ्यासाठी संशोधन केंद्रे सुरू केली आहेत. दुसरीकडे, सद्यस्थितीत भारतातील 'कोव्हिड 19'च्या रुग्णांमध्ये रोज लक्षणीय वाढ होत असली, तरी 16 मेनंतर देशात एकही करोनाचा रुग्ण आढळणार नाही, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी केला आहे. हेही वाचा - पुण्यात एका रात्रीत कोरोनाचे 55 नवे रुग्ण, वॉर्डनिहाय अशी आहे संख्या देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने करोनाच्या संसर्गाचा वेग मंदावला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी झाले असून, ते आता दहा दिवसांवर गेले आहे. त्यामुळे सध्या जरी देशात रुग्णसंख्या वाढत असली, तरी 16 मेनंतर भारतात 'कोव्हिड 19'चा रुग्ण आढळणार नाही, असा निष्कर्ष या अभ्यासाद्वारे मांडण्यात आला आहे. कोरोनाची भारतातील ताजी स्थिती आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या अधिकृत माहितीप्रमाणे, आत्तापर्यंत देशात 27 हजार 892 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 111 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. कोरोनावर मात करण्यात 6 हजार 185 जण यशस्वी ठरले आहेत, तर 872 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरात सध्या जवळपास 20 हजार 835 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या