Home /News /videsh /

'...तर पुन्हा कोरोनाचा प्रसार होणार', वैज्ञानिकांनी चीनला दिला इशारा

'...तर पुन्हा कोरोनाचा प्रसार होणार', वैज्ञानिकांनी चीनला दिला इशारा

चीन - आतापर्यंत 81,518 लोकांना लागण आणि 3,305	मृत्यू. बहुतेक मृत्यू वुहानमध्ये झाले. देशाने ही साथ बऱ्यापैकी आटोक्यात आणली आहे.

चीन - आतापर्यंत 81,518 लोकांना लागण आणि 3,305 मृत्यू. बहुतेक मृत्यू वुहानमध्ये झाले. देशाने ही साथ बऱ्यापैकी आटोक्यात आणली आहे.

एकीकडे कोरोनाचे केंद्र असलेले वुहान कोरोनामुक्त झाले असताना चीनमधील ज्येष्ठ आरोग्य अधिकारी आणि वैज्ञानिकांनी, देशात पुन्हा कोरोनाचे संक्रमण होऊ शकते, असा इशारा दिला आहे.

    बीजिंग, 27 एप्रिल : चीनच्या वुहानपासून कोरोना पसरण्यास सुरुवात झाली, हे सत्य सर्वांना ठावूक आहे. दरम्यान हा व्हायरस पसरला की पसरवला गेला, याबाबत अजूनही वाद आहेत. मात्र या सगळ्यात ज्या वुहानमधून कोरोनानं जगात थैमान घातले, ते शहर आता कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान चीनमधील ज्येष्ठ आरोग्य अधिकारी आणि वैज्ञानिकांनी, देशात पुन्हा कोरोनाचे संक्रमण होऊ शकते, असा इशारा चीनला दिला आहे. एकीकडे कोरोनाचे केंद्र मानल्या जाणार्‍या वुहानमध्ये शेवटच्या रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. असे असताना, चिनी शास्त्रज्ञांनी कोरोना परत येण्याची शक्यता वर्तवली आहे. या शास्त्रज्ञांनी, विदेशातून एकजरी रुग्ण चीनमध्ये आला तर कोरोना नक्की पसरेल. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) रविवारी सांगितले की, चीनमध्ये सध्या परदेशातील संक्रमित लोकांची संख्या 1 हजार 634 आहे आणि त्यातील 22 जणांची प्रकृती गंभीर आहे. परदेशातून संक्रमित लोकांच्या प्रकरणांमुळे पुन्हा कोरोना होण्यापासून रोखणे हे चीनपुढील मोठे आव्हान आहे, असे मत कमिशनचे प्रवक्ते आणि विषाणू शास्त्रज्ञ मेई फेंग यांनी व्यक्त केले आहे. फेंग म्हणाले की, हा साथीचा रोग पुन्हा वाढू नये यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे आणि खबरदारी देखील घेतली पाहिजे. वाचा-ज्या विहानमधून जगभर कोरोना पसरला तिथे आता एकही रुग्ण नाही! आयोगाने म्हटले आहे की देशात अशा 30 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, ज्यांच्यात आजाराचे एकही लक्षण नव्हते. यातील 7 परदेशी नागरिक आहेत. चीनमध्ये अशा प्रकारच्या संक्रमित लोकांची संख्या एक हजारांवर गेली आहे, यातील एकालाही कोरोनाही लक्षणे नव्हती. आतापर्यंत चीनमध्ये 82 हजार 827 लोकांपैकी 77 हजार 394 लोकं निरोगी झाली आहेत. वाचा-कोरोनाविरोधातील लढाई आता आणखी अवघड, लसीबाबत ब्रिटनमधून आली मोठी बातमी वुहान कोरोनामुक्त हुबेईच्या आरोग्य आयोगानं म्हटलं की, शनिवारी वुहानमध्ये कोविड -19पासून संसर्ग किंवा मृत्यूची एकही घटना नोंदली गेली नव्हती. वुहानच्या रुग्णालयातून 11 रूग्ण बरे झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत हुबेईमध्ये संक्रमणाची 68 हजार 128 प्रकरणं नोंदली गेली आहेत, त्यापैकी 50 हजार 333 वुहानमधील आहेत. वाचा-लॉकडाऊन हटवण्याआधी करा 'ही' तयारी, WHOने सर्व देशांना दिल्या सूचना वुहानच्या आकड्यांवर संशय चीनवर असेही आरोप लावले गेले होते की, ते खरी आकडेवारी जाहीर करत नाहीत. चीननेही वुहानमध्ये मृतांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ केली. चीनच्या स्थानिक प्रशासनाने सांगितलं की 16 एप्रिलपर्यंत वुहानमध्ये मृतांच्या संख्येत आणखी 1,290 लोकांची वाढ झाली आणि आता ती संख्या 3,869 वर पोचली आहे. त्यावेळी चीनमधील मृतांची संख्या 4,632 वर पोहचली होती. संकलन, संपादन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या