जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Megablock News: उद्याही मेगाब्लॉक, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर असं असेल वेळापत्रक

Megablock News: उद्याही मेगाब्लॉक, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर असं असेल वेळापत्रक

 प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वेनं हा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 नोव्हेंबर: उद्या रविवार (Sundayअसल्यानं रेल्वेनं पुन्हा एकदा मेगाब्लॉक (Megablock) जाहीर केला आहे. उद्या म्हणजेच 14 नोव्हेंबरला (November 14) मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वेनं हा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. गेल्या रविवारी म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेनं हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला होता. उद्या रेल्वे रुळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील प्रवाशांना (commuters) सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 पर्यंत मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गिकेवरून प्रवास करण्यास परवानगी आहे. कसा आणि कुठे असेल उद्याचा मेगाब्लॉक उद्या सीएसएमटी-विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. हेही वाचा-  ‘चुन चुन कर मारेंगे’, जम्मू काश्मीरमधल्या 38 पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार मेगाब्लॉकच्या काळात सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील डाऊन दिशेकडे जाणाऱ्या लोकल विद्याविहारपर्यंत डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येतील. यावेळी रेल्वे भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील. तर घाटकोपर येथून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकादरम्यान थांबवण्यात येणार नाहीत. हेही वाचा-  T20 World Cup: ‘त्यानं डोकं वापरायला हवं होतं,’ पाकिस्तानच्या पराभवानंतर आफ्रिदी जावयावर नाराज दुसरीकडे सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. याकाळात सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी- कुर्ला आणि पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात