• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • जम्मू-काश्मीरमध्ये 38 पाकिस्तानी दहशतवादी हजर, यादी तयार; सुरक्षा यंत्रणांनी आखला मोठा प्लान

जम्मू-काश्मीरमध्ये 38 पाकिस्तानी दहशतवादी हजर, यादी तयार; सुरक्षा यंत्रणांनी आखला मोठा प्लान

दहशतवादी काश्मीर खोऱ्यातील तरुणांना त्यांच्या संघटनांमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

 • Share this:
  श्रीनगर, 13 नोव्हेंबर: जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) वातावरण विस्कळीत करण्यासाठी पाकिस्तान (Pakistan) सर्व प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आता सुरक्षा यंत्रणांनी (Security Agencies) खोऱ्यात असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. हे दहशतवादी काश्मीर खोऱ्यातील तरुणांना त्यांच्या संघटनांमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दहशतवादी तरुणांचं माइंड वॉश करुन सुरक्षा दल आणि सर्वसामान्यांना मारत आहेत. मात्र आता सुरक्षा दलांनी यादी तयार करून त्यांच्यावर मोठ्या कारवाईची तयारी केली आहे. गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनुसार, सध्या काश्मीरमध्ये 38 पाकिस्तानी दहशतवादी आहेत. यामध्ये लष्करचे 27 तर जैशचे 11 दहशतवादी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले आहेत. तेथून ते हे हल्ले घडवत आहेत. हेही वाचा-  T20 World Cup: 'त्यानं डोकं वापरायला हवं होतं,' पाकिस्तानच्या पराभवानंतर आफ्रिदी जावयावर नाराज सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये 4, कुलगाममध्ये 3, पुलवामामध्ये 10, बारामुल्लामध्ये 10 आणि काश्मीरच्या विविध भागात 11 दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांचा शोध घेऊन एन्काऊंटरची तयारी आता या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा एन्काऊंटर करण्याची तयारी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी काश्मीरमध्ये भीती आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये दहशतवादी बुरहान वानीच्या एन्काउंटरनंतरची परिस्थिती तयार व्हावी, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. हेही वाचा- इंजेक्शन, गोळ्यानंतर आता लवकरच Corona वरील उपचारासाठी Nasal Spray गेल्या वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास, खोऱ्यात तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. मात्र सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून त्यांच्या नियोजनानुसार कारवाई करण्यात व्यस्त आहेत. पाकिस्तान सतत आपली रणनीती बदलत आहे वास्तविक, काश्मीरमध्ये अशांत निर्माण करण्यासाठी पाकिस्तान सतत आपली रणनीती बदलत आहे. यापूर्वी सुरक्षा दलांना एके-47, आयईडी आणि हँडग्रेनेडने लक्ष्य केले जात होते, मात्र आता पिस्तुलाने टार्गेट किलिंगच्या घटना घडत आहेत. पाकिस्तानच्या टार्गेटवर केवळ सुरक्षा दलच नाही तर काश्मीरमध्ये छोटी-मोठी नोकरी करून उदरनिर्वाह करणारे परदेशी भारतीयही आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: