Home /News /entertainment /

सायकल चालवताना लागला आईला धक्का, अभिनेत्री सचदेवाने 9 वर्षाच्या मुलावर केला गुन्हा दाखल

सायकल चालवताना लागला आईला धक्का, अभिनेत्री सचदेवाने 9 वर्षाच्या मुलावर केला गुन्हा दाखल


 इमारतीत सायकल चालवत असताना अभिनेत्री सिमरन सचदेवा हिच्या 65 वर्षीय आईला मुलाने सायकलने धडक दिली

इमारतीत सायकल चालवत असताना अभिनेत्री सिमरन सचदेवा हिच्या 65 वर्षीय आईला मुलाने सायकलने धडक दिली

इमारतीत सायकल चालवत असताना अभिनेत्री सिमरन सचदेवा हिच्या 65 वर्षीय आईला मुलाने सायकलने धडक दिली

मुंबई, 17 मे  : टीव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवा (tv actress simran sachdeva) हिने एका 9 वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीमध्ये या मुलाने आपल्या आईला सायकल चालवत असताना धक्का दिला होता. त्यामुळे सिमरन सचदेवाने थेट पोलिसांमध्ये (mumbai police) गुन्हा दाखल आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या गोरेगाव येथील लोढा फिरोअन्झा इमारातीत राहणाऱ्या टिव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवा हिने एका  9 वर्षाच्या मुलावर गोरेगाव येथील वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.   ही घटना २७ मार्च रोजी घडली होती. इमारतीत सायकल चालवत असताना अभिनेत्री सिमरन सचदेवा हिच्या 65 वर्षीय आईला मुलाने सायकलने धडक दिली. ज्यामुळे सिमरनची आई जमिनीवर कोसळली आणि त्यांच्या पाठीला दुखापत झाली.  गेली दीड महिने सिमरनची आई अंथरुणात खिळून आहे. (चक्क सिंहिणीने सिंहाच्या तावडीतून केली माणसाची सुटका; कधीच पाहिला नसेल असा VIDEO) या घटनेनंतर सिमरन यांना मुलाच्या आईने फक्त व्हॉटसअॅपवर sorry मॅसेज करुन माफी मागितली. पण घडलेल्या घटनेची जबाबदारी मात्र कोणीच घेतली नाही. त्यामुळे मुलं नेमकं काय करतायेत आणि त्यांनी केलेल्या चुकांना आई वडील जबाबदार नाही का? असा प्रश्न उपस्थित करत अभिनेत्रीने थेट 9 वर्षाच्या मुलाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली. सिमरन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या मुलांवर बेजबाबदारपणाचा गुन्हा मुलावर दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. ('आज तू जाऊन 2 वर्षे झाली..' अभिनेता हार्दिक जोशी आजही या खास मित्राला करतो मिस) मी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या आईने मला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून माफी सुद्धा मागितली. पण, या प्रकरणात मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल करायचा होता. अत्यंत निष्काळजीपणे त्याने जिथे सोसायटीमध्ये लोक चालतात तिथे हा प्रकार केला आहे, त्यामुळे गुन्हा दाखल केला. अशी प्रतिक्रिया सिमरन सचदेवाने दिली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या