जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला, अन् परतलाच नाही; परभणीच्या सतीश चौधरीचा भयावह अंत

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला, अन् परतलाच नाही; परभणीच्या सतीश चौधरीचा भयावह अंत

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला, अन् परतलाच नाही; परभणीच्या सतीश चौधरीचा भयावह अंत

वाढदिवसाच्या पार्टीसाठी (Birthday Party in Farm) गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू (Death after fall in well) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यातील बोरी येथे घडली. सतीश कल्याण चौधरी असे मृत युवकाचे नाव आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

परभणी, 17 मे : वाढदिवसाच्या पार्टीसाठी (Birthday Party in Farm) गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू (Death after fall in well) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यातील बोरी येथे घडली. सतीश कल्याण चौधरी असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात (Bori Police Station) तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. विहिरीचा अंदाज आला नाही अन् - बाळासाहेब खापरे नावाच्या व्यक्तीचा वाढदिवस होता. यानिमित्ताने अवधेश ठाकूर यांच्या शेतातील आखाड्यावर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 15 मेला रविवारी रात्री मित्रासांठी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यात जवळपास 35-40 जणांचा सहभाग होता. याचठिकाणी असलेल्या विहिरीचा अंदाज सतीश चौधरी या युवकाला आला नाही. यामुळे तो विहिरीत पडला. हा प्रकार विशाल ईखे यांच्या लक्षात आला. त्याने लगेचच सतीशला काठवर घेतले तसेच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही जण घटनेनंतर याठिकाणी पार्टी सोडून पळूनही गेले, असे सतीशचे भाऊ गजानन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वसंत मुळे, उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, पतंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. हेही वाचा -  Aurangabad Crime: महाविद्यालयीन तरुणीवर कारमध्ये बलात्कार, VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार

सतीष चौधरी या तरुणाच्या पार्थिवावर 16 मेला दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीशच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जावेत, या मागणीसाठी त्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. याप्रकरणी बाळासाहेब खापरे, अवधेश ठाकूर, संदीप कदम या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात