जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'आमच्या कुटुंब प्रमुखाबद्दल कोणी वाईट बोलू नये'; शिंदे गटाच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

'आमच्या कुटुंब प्रमुखाबद्दल कोणी वाईट बोलू नये'; शिंदे गटाच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

'आमच्या कुटुंब प्रमुखाबद्दल कोणी वाईट बोलू नये'; शिंदे गटाच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

त्याच कुटुंब प्रमुखासोबत बंडखोरी करून बाहेर पडले, अन् आता त्यांच्यासाठी उभं राहिल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज पुन्हा शिंदे गटाची भूमिका मांडली. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी सर्वांना अलर्ट केलं. आमच्या कुटुंब प्रमुखाबद्दल कोणाही वाईट बोलू नये हे आम्ही स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. याबाबत त्यांनी ट्विट केलं होतं. सोमय्यांच्या ट्विटनंतर शिंदे गटाने संताप व्यक्त केला होता. उद्धव ठाकरेंविरोधात कोणताही अपशब्द न वापरण्याचाही सल्ला दिला होता. दरम्यान केसरकर आज म्हणाले की, सेना भाजपची युती झाल्यावर पक्षप्रमुखांच्या बाबतीत वाईट बोलणार नाही असं आधीच ठरलं होतं. मात्र सोमय्या बोलले. यानंतर मी म्हटलं की, सोमय्या हे भाजपचे संजय राऊत आहेत का? याबाबत सोमय्या हे दुखावले गेले. त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. आमच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे. त्यांना आम्ही प्रत्युत्तर देणार नाही. आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले तेव्हा आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो होतो. मातोश्रीवर जेव्हा आरोप झाले तेव्हा आमचे व्यासपीठ वापरू नये, असे भाजप आमदारांचे मत होते. पक्ष चिन्हावर कोणीही दावा केलेला नाही. आता आमची युती झाली आहे. त्यामुळे युती सारखच बोलणे झालं पाहिजे. एकीकडे शिवसैनिक दुखावले, मात्र काही जण सुखावलेत. वेळेनुसार जखमा भरल्या जातात. दुःख व मतभेद विसरले जातात. त्यामुळे ही वेळ जाण्याची वाट पाहतोय. एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे पुन्हा येणार एकत्र? पडद्यामागे नेमकं काय आहे सुरू?  राज्यात सत्ता परिवर्तनानंतर एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) गटाकडून  उद्धव ठाकरेच्या  प्रती सौम्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटाची प्रवक्ता दीपक केसरकर म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे फ्लोअर टेस्ट जिंकल्यानंतरही आनंद साजरा करणार नसल्याचं ते म्हणाले होते. बंडखोरांनी उद्धव ठाकरेंबाबत सन्मानजनक गोष्टी सांगितल्या आहेत. मात्र दोन्ही गटात संजय राऊत अडथळा (Eknath Shinde and Uddhav Thackeray will come together again) ठरत असल्याचं दिसून येत आहे. राऊतांबद्दल बंडखोर आमदारांच्या मनात चांगली प्रतिमा नाही. शिंदे गटाने तर संजय राऊतांना एनसीपीचे शरद पवार यांचा एजंट असल्याचं म्हटलं आहे. केसरकरांच्या या भूमिकामुळे शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र येणार का असंही सवाल उपस्थित केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात