मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /देवाच्याच दारात मांडला धंदा, तब्बल दीड किलो गांजा विकताना रंगेहाथ पकडलं!

देवाच्याच दारात मांडला धंदा, तब्बल दीड किलो गांजा विकताना रंगेहाथ पकडलं!

घरातून शोध मोहिम राबवली असता तेथून आणखी दोन लाख 20 हजार रोख व सव्वा तीन किलो चरस जप्त करण्यात NCB ला यश आलंय.

घरातून शोध मोहिम राबवली असता तेथून आणखी दोन लाख 20 हजार रोख व सव्वा तीन किलो चरस जप्त करण्यात NCB ला यश आलंय.

घरातून शोध मोहिम राबवली असता तेथून आणखी दोन लाख 20 हजार रोख व सव्वा तीन किलो चरस जप्त करण्यात NCB ला यश आलंय.

मुंबई, 17 जुलै : गुन्हेगारांना कोणताही धर्म नसतो कारण गुन्हा करण्याकरता ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच एक प्रकार समोर आलाय मुंबईत. NCB म्हणजेच केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या महिन्याभरात तीन विविध कारवायांमध्ये धार्मिक स्थळांच्या (religious place mumbai) आडून अंमली पदार्थ विक्री (drugs) करणाऱ्या व्यक्तींना अटक केली आहे. एनसीबीने अंधेरीतील (andheri) मरोळ परिसरात गुरूवारी कारवाई करून धार्मिक स्थळाच्या आडून गांजाची विक्री करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले आहे. यापूर्वीही दादर व माहिम परिसरात एनसीबीने कारवाई केली होती.

केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक म्हणजेच NCB ला 15 जुलैच्या रात्री अंधेरी पूर्व मरोळ परिसरात एका धार्मिक स्थळांवर गांजाची विक्री केली जात आहे याची माहिती मिळाली. त्यानुसार, सापळा रचून NCB ने एका आरोपीला चक्क धार्मिक स्थळात दीड किलो गांजा विकताना रंगेहाथ पकडलं. सुनिल हुंडेकर असं या आरोपीचे नाव असून या परिसरातील कुख्यात गुंड असल्याने सुनिल मरोळ परिसरातील काही पेडलरच्या संपर्कात होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून धार्मिक स्थळाच्या आडून ड्रग्सची विक्री करत होता. यावेळी तेथील खोलीत दारूच्या बाटल्याही एनसीबीच्या पथकाला सापडल्या होत्या.

Video :...आणि रेल्वे ट्रॅकवर धावू लागली कार; हा प्रताप पाहून प्रवासीही हैराण

ही झाली १५ जुलैची कारवाई याच महिन्यात NCB ने माहिम येथून एका आरोपीला अटक केली तर याच माहिम कारवाई दरम्यान NCB ने जवळपास 15 ते 20 मुलांची सुटका देखील केली. याप्रकरणी वासिम नागोर नावाच्या ड्रग्ज तस्कऱ्याला अटक केली होती. या कारवाईत NCB ने चरस आणि हशीसचा साठा जप्त केला आहे. लहान मुलांना व्यसनांच्या अधीन नेऊन त्यांच्यामार्फत ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी त्यांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. माहीममध्ये शनिवारी रात्री केलेल्या या कारवाईनंतर अल्पवयीन मुलांचे एनसीबीकडून समुपदेशन करण्यात आले असून त्यांना सोडण्यात आले होते.

Ivermectin: कोरोनाच्या उपचारासाठी तुम्ही घेतलं होत्या का या गोळ्या? नवा वाद सुरू

यापूर्वी दादर येथील कारवाई कमलेश  गुप्ता, अमित पटेल, राजविंदर सिंग व गुरमीत सिंग अशी अटक करण्यात आली होती. आरोपी दादर येथील एका धार्मिक स्थळामधील लॉजिंग खोलीत संशयित चरसची खरेदी विक्री करत असल्याची माहिती NCB ला मिळाली होती. त्यानुसार, छापा टाकला असता आरोपी चरसची खरेदी विक्री करत असताना NCB ने त्यांना रंगेहाथ पकडलं. त्यावेळी दोन लाख रोख व कमलेश गुप्ताच्या खोलीतून दोन किलो चरस जप्त करण्यात आले आहे. आरोपी राजविंदर सिंग व गुरमीत सिग दोघेही पंजाबवरून दुचाकीवरून प्रवास करत मुंबईत चरस घेऊन आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

तर कमलेश गुप्ताच्या माहितीवरून चुनाभट्टी येथील घरातून शोध मोहिम राबवली असता तेथून आणखी दोन लाख 20 हजार रोख व सव्वा तीन किलो चरस जप्त करण्यात NCB ला यश आलंय. या आधी NCB च्या जाळ्यात फसू नये याकरता अंमली पदार्थ तस्कर रिक्षा, टॅक्सी सारख्या सार्वजनिक वाहतूक चालवत अंमली पदार्थांची तस्करी करायचे पण त्यांची ही शक्कल NCB ला माहित पडल्याने या अंमली पदार्थ तस्करांनी थेट देवाच्या दारातच नशेचा व्यापार मांडल्याने हे पुन्हा एकदा स्पष्ट झालय की, गुन्हेगारांना कोणताही धर्म नसतो.

First published:
top videos

    Tags: Mumbai