मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Ivermectin: कोरोनाच्या उपचारासाठी तुम्हीही घेतलं होत्या का या गोळ्या? उपयुक्ततेबद्दल प्रश्नचिन्ह; नवा वाद सुरू

Ivermectin: कोरोनाच्या उपचारासाठी तुम्हीही घेतलं होत्या का या गोळ्या? उपयुक्ततेबद्दल प्रश्नचिन्ह; नवा वाद सुरू

Ivermectin च्या वापराबाबतचं सर्वात मोठं संशोधनच चुकीचं असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी या Antiviral औषधाचा वापर करण्यावरून वाद सुरू झाला आहे.

Ivermectin च्या वापराबाबतचं सर्वात मोठं संशोधनच चुकीचं असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी या Antiviral औषधाचा वापर करण्यावरून वाद सुरू झाला आहे.

Ivermectin च्या वापराबाबतचं सर्वात मोठं संशोधनच चुकीचं असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी या Antiviral औषधाचा वापर करण्यावरून वाद सुरू झाला आहे.

  नवी दिल्ली, 17 जुलै : कोरोनावरील (Coronavirus treatment) उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या आयव्हरमेक्टिन (Ivermectin) या औषधाच्या उपयुक्ततेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या औषधाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या संशोधनावर काही संशोधकांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे संशोधकांमध्ये आपापसात वाद सुरु झाले आहेत. सुरुवातीच्या काळात लॅटिन अमेरिका (Latin America) आणि भारतामधून (India) या औषधाला मोठ्याप्रमाणात मागणी वाढली. कारण सुरुवातीला या औषधाचा वापर सर्वाधिक केला गेला आणि तो आताही सुरू आहे. परंतु, मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्स झाल्यानंतर ते वापरण्यास बंदी घातली होती. या सर्व पार्श्वभूमीवर संशोधकांचे आक्षेप, त्यांच्यात सुरु असलेला वाद याविषयी घेतलेला हा आढावा.

  कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी जी औषधे फायदेशीर ठरत आहेत, त्यात आयव्हरमेक्टिन या औषधाचा समावेश होतो. इजिप्तमधील बेन्हा युनिव्हर्सिटीचे डॉ.अहमद एल्गाजार यांनी आयव्हरमेक्टीन या औषधावर संशोधन करुन त्याचा अहवाल गत नोव्हेंबरमध्ये रिसर्च स्क्वेअर वेबसाइटवर (Research Square) प्रकाशित केला होता. हे औषध परजीवी कीडे किंवा उवा मारण्यासाठी उपयुक्त ठरते, मात्र ते कोरोनाविरुध्दही प्रभावी ठरते, असे त्यांनी संशोधननंतर सांगितले होते. या अहवालात त्यांनी म्हटलं होतं की ज्या कोरोनाबाधित रुग्णांनी संसर्गाच्या सुरुवातीच्या कालावधीत आयव्हरमेक्टिन घेतले त्यांना त्याचा अधिक फायदा झाला. त्यांना रुग्णालयात भरती होण्याची गरज भासली नाही आणि जे रुग्णालयात भरती होते, त्यांना हे औषध दिल्यानंतर त्यांचा मृत्यू पासून बचाव झाला. असे हे औषध कोरोनाविरोधात कार्यक्षम आजही ठरत आहे. परंतु, सायंटिफीक रिव्ह्यू वेबसाईटने या संशोधकाचा संशोधन अहवाल आपल्या वेबसाईटवरुन हटवल्यानंतर वाद सुरु झाला आहे. आयव्हरमेक्टिनचे समर्थन करण्याऱ्या या संशोधकावर नैतिक नियमांचा भंग केल्याचा आरोप होत आहे. या औषधाचे समर्थन उजव्या विचारसरणीचे लोकं करत असल्याचा देखील आरोप होत असल्याचे आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

  डॉ. अहमद एल्गाजार हे बेन्हा मेडिकल जर्नलचे मुख्य संपादक असून, संपादकीय मंडळाचे सदस्य देखील आहेत. लोकांना प्रभावित करण्यासाठी एल्गाजर यांनी आयव्हरमेक्टिनचे समर्थन केले. त्यांनी अभ्यास मांडताना अनैतिक पद्धती वापरल्याचा असा आरोप काही वैज्ञानिकांनी केला आहे.

  डॉ. अहमद यांचे हे संशोधन 15 जुलैला रिसर्च स्क्वेअर साइटवरुन हटवण्यात आले आहे. त्यामुळे आयव्हरमेक्टिन खरंच कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपयुक्त आहे का नाही, अशी संभ्रमावस्था जगभरात दिसून येत आहे. मात्र हे संशोधन साइटवरुन का हटवले गेले यावर स्क्वेअर साइटकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले गेलेले नाही.

  कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीचा तिसरा डोस आवश्यक?

  मेडिकल शाखेच्या विद्यार्थ्याला जाणवली होती गडबड

  लंडन (London) येथील मेडिकल शाखेचा विदयार्थी जॅक लॉरेन्स याला डॉ. अहमद एल्गाजार यांच्या संशोधनात काहीतरी गडबड आहे, असं जाणवलं होतं. एका प्राध्यापकाने असाईनमेंट म्हणून जेव्हा डॉ. अहमद यांचा संशोधन अहवाल वाचण्यास सांगितले तेव्हा जॅक लॉरेन्सला ही शंका जाणवली. या संशोधन अहवालातील इंट्रोडक्टरी (Introductory) असलेला परिच्छेद कुठून तरी कॉपी केला आहे म्हणजेच साहित्यिक चोरी झाल्याचे जॅकला जाणवले. काही की वर्ड्स बदलले होते. त्यांच्या अहवालातला हा चोरल्यासारखा वाटणारा पॅरेग्राफ कुठल्यातरी प्रेस रिलीजमधून उचलून थेट अहवालात पेस्ट केला आहे अशी शंका जॅकला वाटली. यात एका ठिकाणी सिव्हीअर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोमच्या जागी चुकून एक्सट्रिम इंटेन्स रेस्पिरेटरी सिंड्रोम असा उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख विनोदी आणि चुकीचा आहे. हा सारा प्रकार पाहिल्यानंतर जॅक लॉरेन्सने डॉ. अहमद यांचा संशोधन अहवाल सखोल आणि बारकाईने वाचला असता त्यात गडबड असल्याचे त्याला जाणवले.

  जॅक लॉरेन्सला आढळलेले मुद्दे

  - डॉ. अहमद एल्गाजार यांनी या संशोधनात 18 ते 80 वयोगटातील व्यक्तींचा समावेश केल्याचे सांगितले परंतु, त्यात 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या तीन व्यक्तींचा संदर्भ आढळून आला.

  - डॉ. अहमद एल्गाजार यांनी संशोधनात असा दावा केला आहे की त्यांनी 8 जून आणि 20 सप्टेंबर 2020 दरम्यान हे संशोधन केले आहे. परंतु, कच्च्या डेटानुसार, रुग्णालयात भरती असलेले बहुतांश रुग्ण आणि मृत्यूमुखी पडलेले रुग्ण अशा सर्व केसेस 8 जून पूर्वीच्या होत्या. हा डेटा अत्यंत चुकीच्या पध्दतीने फॉरमॅट करण्यात आला होता.

  - सर्वात विशेष बाब म्हणजे एका रुग्णाची रुग्णालायातून डिस्चार्जची तारीख 31 जून 2020 अशी लिहीली होती जी कॅलेंडरमध्ये कधीच नसते.

  - डॉ. अहमद यांनी संशोधनात म्हटलय की 100 रुग्णांपैकी 4 रुग्णांचा मृत्यू हा स्टॅण्डर्ड ट्रिटमेंटमुळे झाला. या रुग्णांना हलका किंवा मध्यम स्वरुपाचा संसर्ग झाला होता. परंतु, जॅक लॉरेन्सच्या म्हणण्यानुसार, मूळ डेटा झिरो आहे. हा मूळ डेटा आयव्हरमेक्टिनच्या वापरासह दाखवला गेला आहे. ज्या गंभीर रुग्णांचा इलाज आयव्हरमेक्टिन देऊन केला गेला त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. पण कच्चा डेटा ही संख्या 4 दाखवतो.

  सर्जरी करताना हातात लावली टाईटेनियम प्लेट; वीज पडताच जळून गेलं पूर्ण शरीर

  जॅक लॉरेन्स आणि द गार्डियन वृत्तपत्राने याप्रश्नांबाबत डॉ. अहमद एल्गाजार यांना इ-मेल पाठवला. परंतु, त्यांच्याकडून तसेच युनिव्हर्सिटीच्या प्रेस कार्यालयाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यानंतर जॅक लॉरेन्स याने ऑस्ट्रेलियन क्रॉनिक डिसीस एपिडेमियोलॉजिस्ट जिडीयोन मिरोविटज काटज आणि स्वीडन येथील लिनियस युनिव्हर्सिटीचे डेटा अनालिस्ट निक ब्राऊन यांच्याशी संपर्क साधून डॉ. अहमद यांच्या संशोधनाच्या डेटाची तपासणी करण्याची विनंती केली. या दोन्ही तज्ज्ञांनी डॉ. अहमद यांच्या संशोधनातील चुकांची यादीच बाहेर काढली. डॉ. अहमद यांनी रुग्णांचा डेटा रिपीट केल्याचे यात स्पष्टपणे दिसते, असे या दोघांनी सांगितले. यात 79 रुग्णांचा डेटा क्लोन (Data Clone) केला आहे. डॉ. अहमद यांनी जाणूनबुजून या संशोधनात चुका केल्या आहेत. हा डेटा एकदम बरोबर वाटावा यासाठी तो अत्यंत चुकीच्या पध्दतीने मांडल्याचे निक ब्राऊन यांनी सांगितले.

  यापूर्वी सिडनी येथील डॉक्टर काइल शेल्ड्रीक यांनी आयव्हरमेक्टिनच्या संशोधनाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यात डॉ. अहमद यांच्या संशोधनाचाही समावेश होता. त्यांनी या संशोधनात अनेक गणितीय चुका केल्याचे शेल्ड्रिक यांचे म्हणणे होते. परंतु, त्यावेळी कोणीही हे म्हणणं विचारात घेतलं नाही.

  First published:
  top videos

   Tags: Coronavirus