पोलीस मागे लागल्यानंतर एक व्यक्तीने थेट ट्रेनच्या ट्रॅकवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रिटेनमध्ये ही घटना घडली असून सुरुवातीला व्यक्तीने आधी पोलिसांना धक्का मारला आणि त्यानंतर फरार झाला.
ही घटना ब्रिटेनमधील हर्टफोर्डशायर स्थित चेशंट स्टेशन येथील आहे. 'मिरर यूके'च्या एका बातमीनुसार, ही कार चोरीची होती. अधिकाऱ्य़ांना याबाबत सूचना मिळाली होती. एक चोरी झालेली कार एसेक्समधून काउंटीमध्ये नेण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं आणि खाली उतरायला सांगितलं. जसं पोलिसांनी ड्रायव्हरला खाली उतरण्यास सांगितलं तर तो धक्का मारून फरार झाला. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ड्रायव्हर तेथून पळून गेला. कोणताही रस्ता दिसला नाही तर त्याने रेल्वे ट्रॅकवर गाडी नेली आणि तेथून फरार होण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर पोलिसांनी ड्रायव्हरचा पाठलाग केला.
हे ही वाचा-VIDEO कुत्र्यांसमोर नाचणाऱ्या 'बसंती'चा डान्स सुपरहिट; इंटरनेटवर तुफान व्हायरल
So this happened today… pic.twitter.com/CwnMZzBzsO
— A (@Cyp_Alii) July 15, 2021
Man was tekking from the police on the tracks 😭😭 pic.twitter.com/Jkp2CTuCRb
— A (@Cyp_Alii) July 15, 2021
रिपोर्टनुसार, ड्रायव्हर तेज गतीने रेल्वे ट्रॅकवर कार चालवू लागला. हा सर्व प्रकार स्टेशनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. ट्रॅकवर गाडी चालविल्यामुळे गाडीतून धूर येत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. याशिवाय स्टेशनवर अनेक लोक उभे असल्याचे दिसत आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रेल्वे ट्रॅकवर कार बघून प्रवासी हैराण झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Viral video.